वाळपई पोलिसांत गुन्हा नोंद

वाळपई : एका ३७ वर्षीय महिलेवर बळजबरी करून बलात्कार केल्याचा गुन्हा वाळपई पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला आहे. वाळपई पोलिसांनी या प्रकरणी विठ्ठल झोरे (रा. अनसोळे) याला अटक केली असून त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
वाळपई पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी एका महिलेला आपल्या चारचाकी वाहनामध्ये घेऊन तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. रेडीघाट या भागामध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. अशाप्रकारची तक्रार सदर महिलेने वाळपई पोलीस स्थानावर विठ्ठल झोरे याच्याविरोधात दिली होती. त्या संदर्भाची चौकशी करून वाळपई पोलिसांनी विठ्ठल झोरे (वय ४१) याच्यावर बळजबरी करून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, संशयित आरोपी विठ्ठल झोरे याला वाळपई प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभे केले असता त्याला चौकशीसाठी चार दिवसांची कोठडी देण्यात आली. दरम्यान, सदर प्रकरणाने खळबळ निर्माण झाली आहे. वाळपई पोलीस निरीक्षक विदेश शिरोडकर या संदर्भात अधिक चौकशी करीत आहेत. त्यांनी दिलेल्या पुढील माहितीनुसार, महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, संशयित आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.