तुम्ही स्वतःला एखाद्यापेक्षा चांगले काम करण्यासाठी प्रशिक्षित करू शकता, पण त्याचा उपयोग आणि क्षेत्र मर्यादित आहे. तुम्ही ते आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही आणि अधिक हुशार होण्याचा प्रयत्न करू शकत नाही, कारण तुम्ही फसवत असलेली एकमेव व्यक्ती तुम्हीच आहात.

सद्गुरू : हुशार असणे आणि बुद्धिमान असणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पंचवीस वर्षांपूर्वी, तुम्ही एखाद्याला बुद्धिमान म्हणत असाल. पण आजकाल शब्दावली वेगळी आहे. तुम्ही बुद्धिमान आहात की नाही याची कोणाला पर्वा नाही. तुम्ही हुशार आहात की नाही याची त्यांना काळजी आहे. जर तुम्ही हुशार आहात, तर तुम्ही या जगातून तुमचा मार्ग काढू शकता - तुम्ही सध्याच्या अर्थव्यवस्थेत यशस्वी व्हाल! पण बुद्धिमत्ता वेगळ्या स्वरूपाची आहे. बुद्धिमत्ता नेहमीच
तुम्हाला शर्यत जिंकण्यासाठी सज्ज करत नाही. खरे तर, तुम्ही कदाचित इतरांपेक्षा खूप मंद असू शकता, कारण ते करत असलेल्या गोष्टींपेक्षा खूप जास्त गोष्टी तुम्ही पाहता. जे हुशार आहेत आणि जीवनात केवळ एक लहान ध्येय साध्य करू इच्छित आहेत, ते खूप वेगाने तिथे पोहोचू शकतात - आणि कदाचित प्रत्येकजण टाळ्या वाजवेल. पण कदाचित एक पाऊल टाकण्यासाठी देखील तुमची बुद्धिमत्ता खूप साऱ्या गोष्टींचा विचार करत असेल.
जर तुम्ही हुशार आहात, तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या फायद्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिस्थिती जुळवून आणली आहे. तुम्ही कोणत्या प्रकारच्या समाजात आहात, कोणत्या काळात, कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या प्रकारच्या लोकांमध्ये आहात, यावर अवलंबून वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना हुशार मानले जाते. आज, ज्यांच्याकडे काही तत्त्वे आहेत, साधारणपणे त्यांना मूर्ख मानले जाते. अगदी बेईमान लोक हुशार ठरतात, कारण त्यांना विशिष्ट परिस्थितीचा फायदा कसा घ्यायचा हे माहीत असते.
मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक अतिशय हुशार कुत्रा होता. तो इतका हुशार होता की, स्थानिक गावातल्या इतर कुत्र्यांपेक्षा तो एक चांगला कुत्रा बनला. एके दिवशी, त्याने थोडे धाडस केले. तुम्ही पहिले असेल, गावातील कुत्रे कधीही जंगलात जात नाहीत. कदाचित कधीकधी ते फक्त सीमेपर्यंत जातात, ससा किंवा तत्सम शिकार करण्याचा प्रयत्न करतात, पण ते कधीही आतपर्यंत जात नाहीत, कारण त्यांना हे माहीत असते की, तिथे मोठे प्राणी आहेत, ज्यांच्यासाठी ते फक्त एक घास ठरतील.
पण हा एक अति-हुशार कुत्रा आहे, म्हणून तो जंगलात आतपर्यंत गेला, जिथे एका वाघाने त्याला पाहिले. वाघाने यापूर्वी कधीही अशा प्राण्याला पाहिले नव्हते. त्याने विचार केला, ‘तो दुपारच्या नाश्त्यासारखा दिसत आहे.’ तो गुरगुरला आणि कुत्र्याकडे येऊ लागला. पण हा एक अतिशय हुशार कुत्रा आहे. त्याला पळायचे होते, पण त्याला माहीत होते की, जर तो पळाला, तर वाघ लगेच पकडेल आणि तो एक चविष्ट नाश्ता बनेल. त्याने जवळच हाडांचा ढीग पाहिला आणि म्हणाला, ‘अरे देवा! या वाघांना खाणं खूप चांगलं जेवण आहे.’ वाघ बिचकून मागे सरकला. ‘अरे, हा असा काहीतरी प्राणी आहे,
जो वाघांना स्वतःचं जेवण बनवतो. आणि हे सारे हाडांचे ढीग.’ तो मागे वळला आणि निघून गेला. हे पाहून, हुशार कुत्रा हळूहळू तिथून निघू लागला. जवळच्या झाडावर बसलेल्या माकडाने संपूर्ण दृश्य पाहिले आणि या परिस्थितीत खोड्या करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. त्याने वाघाला सांगितले, ‘त्याने तुम्हाला मुर्ख बनवलं आणि निघून गेला. तो फक्त एक कुत्रा आहे. मी गावांमध्ये गेलो आहे. तो तुम्हाला काहीही करू शकत नाही. त्याच्याकडे तुमच्या एका पंजाइतकीही शक्ती नाही.’ वाघ खजील झाला. ‘काय? त्या मूर्खाने मला फसवले? चल, त्याला पकडूया.’ म्हणून माकड वाघाच्या पाठीवर बसला आणि ते कुत्र्याकडे धावू लागले.
कुत्र्याने एक माकड वाघावर स्वार होऊन त्याच्याकडे येत आहे हे पाहिले. काय घडले असावे हे त्याला उमगले, पण हा एक हुशार कुत्रा आहे. त्याने जांभई दिली आणि म्हणाला, ‘ते फालतू माकड कुठे आहे? आणखी एक वाघ आणायला पाठवलं होतं, या गोष्टीला जवळजवळ तास झाला आहे. कुठे आहे तो?’
तुम्ही अशा प्रकारे जगाला हाताळू शकता. पण जेव्हा तुमच्या अंतरिक स्वरूपाचा विषय येतो, तेव्हा ते तुम्हाला कुठेही पोहोचवणार नाही, कारण निर्मितीच्या प्रकटीकरणाला हाताळणे ही एक गोष्ट आहे, निर्मितीच्या स्रोताला हाताळणे ही संपूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. इथे, तुमची हुशारी अजिबात काम करणार नाही. हुशारी फक्त तेव्हाच चांगली आहे, जेव्हा तुम्ही आणि इतर असतात. जेव्हा इथे फक्त तुम्ही आणि तुम्ही असता, तेव्हा तुम्ही जितके हुशार आहात असे तुम्हाला वाटते, तेव्हा तितके अधिक मुर्ख ठरता.
आत्मज्ञान ही एखादी सिद्धी नाही. आत्मज्ञान म्हणजे तुम्ही तुमच्या अज्ञानातून बाहेर पडला आहात. हा एक बोध आहे - याचा अर्थ तुम्हाला हे कळले आहे की, तुम्ही किती मुर्ख आहात. जे नेहमीच तिथे होते, ते तुम्ही आज पाहिले. तुम्ही किती मूर्ख आहात हे समजण्यासाठी खूप बुद्धिमत्ता लागते. बहुतेक लोक ते पाहू शकत नाहीत. जर हुशार आणि खास असण्याची, इतरांपेक्षा अधिक चांगले असण्याची तीव्र इच्छा तुमच्या आत पूर्णपणे नष्ट झाली असेल, तर तुम्ही ते पाहू शकता. तेव्हाच तुमच्याकडे स्वतःच्या अज्ञानातून बाहेर पडण्याची बुद्धिमत्ता असेल. जर तुम्ही आध्यात्मिक प्रक्रियेबाबत अधिक हुशारी केलीत, तर तुमचे अज्ञान वेगवेगळे स्वरूप घेत राहील. मग तो अज्ञानाच्या एका पातळीपासून दुसऱ्या पातळीपर्यंत एक अंतहीन प्रवास असेल.
मी असे म्हणत नाही की, हुशार असणे चुकीचे आहे. तुम्ही स्वतःला एखाद्यापेक्षा चांगले काम करण्यासाठी प्रशिक्षित करू शकता, पण त्याचा उपयोग आणि क्षेत्र मर्यादित आहे. तुम्ही ते आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही आणि अधिक हुशार होण्याचा प्रयत्न करू शकत नाही, कारण तुम्ही फसवत असलेली एकमेव व्यक्ती तुम्हीच आहात. जर तुम्ही आणि मी असेल, तर तुमच्यापेक्षा मी हुशार असणे उपयोगी ठरते. जर मी आणि मी असेन, तर माझ्यापेक्षा मी हुशार असणे मूर्खपणाचे आहे.

- सद्गुरू
(ईशा फाऊंडेशन)