कला अकादमीची ‘रिपर्टरी कंपनी’ पुन्हा होणार सुरू

तरुण कलाकारांना मिळणार संधी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th December, 10:46 pm

पणजी : कोविड महासाथीमुळे आणि त्यानंतरच्या दुरुस्ती कामामुळे मागील काही वर्षांपासून बंद पडलेली कला अकादमीची ‘रिपर्टरी कंपनी’ (रंगमेळ) प्रायोगीक तत्वावर अर्धवेळ कलाकार घेऊन पुन्हा सुरू झाली.पुन्हा सुरू झाली. नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांच्या पुढाकाराने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. दीर्घ प्रतीक्षेनंतर रिपर्टरी सुरू झाल्याने गोव्याच्या रंगभूमीवरील कलाकार आणि रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

‘धर्ती आबा’ नाटकाने शुभारंभ
पुनरारंभानंतर रिपर्टरीने भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित ‘धर्ती आबा’ हे पहिले हिंदी नाटक सादर केले. अनुसूचित जमाती कल्याण संचालनालयाच्या सहकार्याने या नाटकाची निर्मिती केली. लेखक ऋषिकेश सुलभ आणि दिग्दर्शक सुशांत नायक यांच्या नेतृत्वाखाली अनेक गोमंतकीय अभिनेते व तंत्रज्ञांनी यात सहभाग घेतला. विशेष म्हणजे सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हलसाठी या नाटकाची निवड झाली.

तरुण कलाकारांना संधी
नाट्यशिक्षण पूर्ण करून संघर्षाच्या काळात असलेल्या तरुण कलाकारांना यामुळे आश्रय आणि कामाची संधी मिळेल. तसेच तंत्रज्ञान, प्रकाशयोजना आणि नेपथ्य विकासाला चालना मिळेल. सामान्य संस्था करू शकत नाहीत अशी प्रायोगिक आणि धाडसी नाटके येथे सादर करता येतील, असे मत अध्यक्ष चंद्रकांत कवळेकर यांनी व्यक्त केले.

कलाकारांना १५ हजारांचे मानधन
रिपर्टरी अंतर्गत काम करणाऱ्या कलाकारांना मासिक १५ हजार रुपये मानधन देण्यात येईल. तसेच यापुढे रिपर्टरी कंपनीसाठी कलाकार निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे कवळेकर यांनी सांगितले.

#Goa #KalaAcademy #Theatre #ChandrakantKavlekar #ArtAndCulture #SerendipityFestival #Panaji
हेही वाचा