गोवा : ‘मुद्रा’ योजनेच्या २५ टक्के लाभार्थी महिला उद्योजक

पाच वर्षांत ३,४३२ कोटींपैकी महिला उद्योजकांना ८४८.४ कोटी रुपयांचे कर्ज

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st December, 11:52 pm
गोवा : ‘मुद्रा’ योजनेच्या २५ टक्के लाभार्थी महिला उद्योजक

पणजी : पीएम मुद्रा कर्ज योजने (PM Mudra loan scheme) अंतर्गत राज्यातील महिला उद्योजकांना (Goan women entrepreneurs) १ एप्रिल २०२० ते ३० ऑक्टोबर २०२५ दरम्यान ३,४३२ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. यातील ८४८.४ कोटी रुपये कर्ज (२४.७१ टक्के) हे महिला उद्योजकांना देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरील कालावधीत अर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये राज्यातील २४ हजार १३१ महिला उद्योजकांना सर्वाधिक २०३.४० कोटी रुपये कर्ज वितरित करण्यात आले होते. त्यानंतर २०२३- २४ मध्ये १८ हजार ८८६ महिलांना १८१.३८ कोटी, २०२१-२२ मध्ये १६ हजार ६१० महिलांना १३९.३५ कोटी, २०२०- २१ मध्ये १७ हजार ९३१ महिलांना १३०.६७ कोटी, २०२४- २५ मध्ये ११ हजार ४६१ महिलांना १२७.८४ कोटी तर १ एप्रिल २०२५ ते ३० ऑक्टोबर २०२५ दरम्यान ४६७३ महिलांना ६५.७६ कोटी रुपये कर्ज वितरित झाले आहे.

संपूर्ण देशाचा विचार करता, वरील कालावधीत २० कोटीहून अधिक महिला उद्योजकांना १० लाख कोटींहून अधिक कर्जे वितरित करण्यात आली आहेत.आर्थिक वर्ष २०२२- २३ मध्ये ४.४५ कोटी महिलांना सर्वाधिक २.१५ लाख कोटी रुपये कर्ज वितरीत झाले होते. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश बिहार, तमिळनाडू या राज्यातील महिलांनी या योजनेचा लाभ अधिक प्रमाणात घेतला आहे, तर अरुणाचल प्रदेश मिझोरम सिक्कीम येथे ही संख्या तुलनेने कमी आहे.

आतापर्यंत ३० कोटी लाभार्थी

१ एप्रिल २०२० ते ३० ऑक्टोबर २०२५ दरम्यान संपूर्ण देशात ३० कोटींहून अधिक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. वरील कालावधीत एकूण २४ लाख २२ हजार १४२ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. सर्वाधिक ३.०३ कोटी लाभार्थी महाराष्ट्रातील होते.       

हेही वाचा