ओंकार हत्तीची पेडणेतील तोरसेत धडक : भीतीने १६ विद्यार्थ्यांनी चुकवली शाळा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
8 hours ago
ओंकार हत्तीची पेडणेतील तोरसेत धडक : भीतीने १६ विद्यार्थ्यांनी चुकवली शाळा

पेडणे : गोव्याची (Goa) हद्द ओलांडून महाराष्ट्रात (Maharashtra) पोचलेला ओंकार हत्ती पुन्हा एकदा गोव्यात पोचल्यानंतर त्याने बागायतीची नासधूस करणे सुरू केली आहे. त्यामुळे पेडणे (Pernem) परिसरातील लोकांनी त्याची धास्ती घेतली आहे. हत्ती पेडणेतील तोरसे येथील हरिजन वाड्यावर पोचल्याचे कळताच या परिसरातील १६ विद्यार्थ्यांनी धसक्याने शाळेत (School) जाणे टाळले. 

६३ दिवसांनंतर या हत्तीने पुन्हा एकदा गोव्यात आगमन केले आहे. ३० रोजी हत्ती पाटा पत्रादेवी येथे आल्यानंतर मध्यरात्री १ नंतर तोरसे हरिजन वाडा येथे पोचला. याठिकाणी केळी, कवाथे, पोफळी व एकूण बागायतींची नासधूस करणे सुरू केले.

वन खात्याचे (Foresht Department) कर्मचारी त्याला परत सीमेबाहेर हुसकावून लावण्यासाठी हातात गंडेल बॉंब, रात्रीच्या वेळी काळोखात पेटवण्यासाठी मशाली व इतर साहित्य याची जमवाजमव करीत असताना दिसत होते. हत्ती गावात घुसल्याने, स्थानिकांनी धास्ती घेतली आहे. शाळकरी मुलांनी शाळेत जाणे टाळले आहे. हत्तीचा लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. 




हेही वाचा