गोवा गृहनिर्माण मंडळ कोट्यावधी रुपयांच्या भूखंडांचा लिलाव करणार

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
16 mins ago
गोवा गृहनिर्माण मंडळ कोट्यावधी रुपयांच्या भूखंडांचा लिलाव करणार

पणजी: गोवा गृहनिर्माण मंडळाने (Goa Housing Board) कोलवाळ (Colvale) आणि हरवळे (Harvalem) येथील दोन भूखंड लिलावास काढले आहेत.  या दोन्ही भूखंडांसाठी (Plot) फक्त मूळ ठेव २ ते ५ कोटी रुपयांपर्यंत आहे. दोन्ही भूखंड ई-लिलावाद्वारे विकले जातील,असे गृहनिर्माण मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

गोवा गृहनिर्माण मंडळाने ई-लिलावाद्वारे (E Auction) व्यावसायिक भूखंडांच्या थेट विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी गोवा ऑनलाइन वेबसाइटला भेट द्यावी आणि १ डिसेंबर, २०२५ ते २२ डिसेंबर पर्यंत अर्ज करावा. सविस्तर माहिती गोवा गृहनिर्माण मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

कोलवाळ, बार्देस येथील सी १ हा ३५,२०० चौरस मीटरचा प्लॉट उपलब्ध आहे.  २०० एफएआरसह, भूखंडाची मूळ किंमत प्रति चौरस मीटर १८,००० रुपये एवढी आहे.  या भूखंडासाठी मूळ ठेव ५ कोटी रुपये आहे.

तर जीएसटीसह ५,९०० रुपये नोंदणी शुल्क आहे. ते परत केले जाणार नाही.   सेक्टर बी मध्ये ३,८२८ चौरस मीटर प्लॉट उपलब्ध आहे. १०० एफएआरसह प्लॉटची मूळ किंमत प्रति चौरस मीटर ८,००० रुपये एवढे आहे.  या प्लॉटसाठी मूळ ठेव १ कोटी रुपये आहे. तर जीएसटी सह ५,९०० नोंदणी शुल्क आहे. ते परत केले जाणार नाही. या दोन्ही प्लॉटांचा ई-लिलाव केला जाणार आहे.  हे प्लॉट मूळ किंमतीपेक्षा जास्त बोली लावणाऱ्याला मिळणार आहेत.  




 


हेही वाचा