चणे भाजण्यासाठी विषारी रसायनाचा वापर; आरोग्यास धोकादायक

शिवसेना खासदाराने केली केंद्रीय मंत्र्यांशी तक्रार : लिव्हर, किडणी व मूत्राशयाचा कॅन्सर होण्याचा धोका

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
22 mins ago
चणे भाजण्यासाठी विषारी रसायनाचा वापर; आरोग्यास धोकादायक

मुंबई : चणे भाजण्यासाठी (Roasted Chickpeas) विषारी ऑरामाइन रसायनाचा (Poisons Oramine Chemical) वापर केला जात असून, चण्यांना आकर्षक रंग देण्यासाठी या रसायनाचा वापर केला जात असल्याचे पुढे आले आहे.

यासंदर्भात शिवसेना (Shivsena UBT) (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार प्रियांका चतुर्वेद‌ी (Member of Parliamnent Priyanka Chaturvedi) यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा, अन्न प्रक्रिया मंत्री चिराग पासवान यांच्याकडे तक्रार केली आहे. चणे भाजण्यात वापरली जाणारी रसायने धोकादायक असल्याने, त्यावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

केंद्रीय मंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत एका अहवालाचा दाखला देत म्हटले आहे की, ऑरामाइन हा एक औद्योगिक डाय आहे. त्याचा वापर लेदर व कपड्यांसाठी केला जातो. रंग गडद करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तेच ऑरामाइन भाजलेल्या चण्यांमध्ये वापरले जाते. याप्रकारामुळे केवळ अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत नाही तर तमाम भारतीयांचे आरोग्य धोक्यात घालण्याचा हा प्रकार आहे. 

लिव्हर, किडणी व मूत्राशयाचा कॅन्सर होण्याचा धोका

अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत अन्नात ऑरामाईनचा वापर करण्यास बंदी आहे. तरीही त्याचा मोठ्याप्रमाणात वापर केला जात आहे. ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने’ (International Agency for research on Cancer) त्याला संभाव्य कार्सिनोजेन म्हणून संबोधले आहे. त्यात जागतिक आरोग्य संघटना त्यात कॅन्सर निर्मितीचे घटक असल्याचे मानत आहे. त्यामुळे लिव्हर, किडणी व मूत्राशयाचा कॅन्सर होण्याचा धोका आहे व मज्जासंस्थेवरही परिणाम होऊ शकत असल्याचे आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. 


हेही वाचा