आणि लग्नाच्या अर्ध्या तासातच नवरदेवाचा लग्न मंडपात मृत्यू

ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन ; लग्न सोहळ्यावर दु:खाचा डोंगर

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
आणि लग्नाच्या अर्ध्या तासातच नवरदेवाचा लग्न मंडपात मृत्यू

अमरावती : लग्न सोहळा म्हणजेच सुखी संसाराची स्वप्ने पाहणारे दोन जीव एकत्र येऊन लग्न गाठ बांधण्याचा आनंदाचा क्षण. मात्र, याच सोहळ्यात विघ्न येऊन भर मंडपात नवरदेवच हे जग सोडून गेला तर?

अशीच एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना महाराष्ट्रातील (Maharashtra) अमरावतीतील (Amravati) वरुड तालुक्यात घडली आहे. लग्न मंडपात मंगल वाद्ये वाजली. मंगलाष्टके झाली. नवरा नवरीने एकमेकाच्या गळ्यात पुष्पमाळाही घातल्या. 

मात्र,  लग्न सोहळ्याच्या अर्ध्या तासातच नवरा अमोल यांना ह्रदयविकाराचा (Heart attack) तीव्र झटका येऊन लग्न मंडपात कोसळला आणि गतप्राण झाला.आणि एका क्षणात लग्न मंडपातील वातावरण पूर्णपणे बदलले. मंगलमय वातावरण दु:खाच्या सावटात पर‌िवर्तीत झाले.

लग्न सोहळ्याला उपस्थित असलेले कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी आणि मंडपातील सर्वांनाच अश्रू अनावर झाले. वरुड तालुक्यातील (Varud)  पुसला गावचे कोतवाल अमोल गोड (Amol God) यां‍चे लग्न सोहळा सुरू झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 

 लग्नमंडपात शोककळा

वरुड तालुक्यातील पुसला गावचे कोतवाल अमोल गोड यांचा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. 

मंगळवारी दुपारी ठरलेल्या शुभ मुहूर्तावर अमोल यांचा विवाह संपन्न झाला. शुभ मंगल सावधान म्हणत मंडपात उपस्थित असलेल्यांनी नवजोडप्याला सुखी संसारासाठी शुभेच्छाही दिल्या. मात्र, लग्न सोहळयाच्या अर्ध्या तासानंतरच अमोल यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला व मंडपातच कोसळला.

त्यानंतर त्याला हॉस्प‌िटलातही नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी अंतिम श्वास घेतल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. आणि मुलगा व मुलीचे कुटुंब, नातेवाईक सर्वांवरच दु:खाचा डोंगर कोसळला. 


हेही वाचा