
फोंडा : धड्यार,धारबांदोडा येथे मित्रांसोबत नदीवर (River) आंघोळीसाठी गेलेला एक १५ वर्षीय विद्यार्थी (Student) बुडाला. आणखी एकाला बुडताना सोबत असलेल्या मित्रांनी वाचवले. बुडालेला विद्यार्थी स्थानिक आहे. त्याचा सध्या शोध घेतला जात आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, पाच विद्यार्थी क्रिकेटचा सराव सोडून धड्यार येथे नदीत आंघोळीसाठी गेले. आंघोळीसाठी नदीत उतरले असता, त्यातील दोघे विद्यार्थी पाण्यात बुडू लागले. प्रसंगावधान राखून सोबत असलेल्या मित्रांनी एकाला वाचवले तर एकाला वाचवणे शोध शक्य झाले नाही.
यासंदर्भात पोलीस (Goa Police) व अग्नीशामक दलाला माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोचले. बुडालेल्या विद्यार्थ्याचा शोध घेतला जात आहे. बुडालेला विद्यार्थी हा स्थानिक असून, इतर चारजण फोंडा (Ponda) येथील आहेत.