२० वर्षांनंतर टाटा सिएराचे दमदार पुनरागमन, ऑटो बाजारात खळबळ

किंमत अपेक्षेपेक्षा लक्षणीयरित्या कमी. सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस, म्हणाले-'क्रेटा-सेल्टॉस गेले कामातून!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
२० वर्षांनंतर टाटा सिएराचे दमदार पुनरागमन, ऑटो बाजारात खळबळ

नवी दिल्ली: भारतीय ऑटो बाजारात सुमारे २० वर्षांनंतर टाटा मोटर्सची दमदार एसयूव्ही सिएरा (Tata Sierra) पुन्हा दाखल झाली आणि अक्षरशः खळबळ माजली. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी ही कार जेव्हा पहिल्यांदा लोकांसमोर आणली गेली. तिची प्राथमिक किमत जेव्हा समोर आली तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. ग्राहकांच्या अपेक्षांपेक्षा ही किंमत बरीच कमी असल्याने, सोशल मीडियावर क्रेटा आणि सेल्टॉस गेले कामातून!, टाटाने 'हर घर डिफेंडर' योजना सुरू केली की काय ? अशा मजेशीर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला.


tata sierra will be showcased to the world for the first time today know  its special features इंतजार खत्म! आज पहली बार दुनिया के सामने आएगी टाटा  सिएरा, जानिए इसकी खासियत, Auto


टाटाने आपली एसयूव्ही सिएरा अवघ्या ११.४९ लाख रुपये (एक्स-शोरूम) या सुरुवातीच्या किमतीत उतरवून थेट ह्युंदाईच्या क्रेटा (Creta) आणि कियाची सेल्टॉस (Seltos) या गाड्यांना मोठे आव्हान दिले आहे.


कार लवर्स को पहली बार 'SUV' की फीलिंग देने वाली गाड़ी वापस आ रही है? - The  Lallantop


'हर घर डिफेंडर योजना'

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्सनी या कारवर भरभरून प्रेम व्यक्त केले. एका युजरने तर या कारची तुलना थेट लँड रोव्हरच्या महागड्या एसयूव्ही 'डिफेंडर' (Defender) शी केली. 'डिफेंडर'ची किंमत भारतात ९८ लाख रुपयांपासून सुरू होते. सिएराची सुरुवातीची किंमत केवळ ११.४९ लाख असल्याने, युजर्सनी याला गमतीने 'हर घर डिफेंडर योजना' असे विनोदी नाव दिले आहे. अशा प्रतिक्रियातून या कारच्या एन्ट्रीमुळे प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या अडचणी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.


Tata Sierra ICE Launched Today: Price ₹11 Lakh, Features, Engine | 22 साल  बाद मॉडर्न लुक में टाटा सिएरा लॉन्च: शुरुआती कीमत ₹11.49, तीन स्क्रीन वाली  टाटा की पहली SUV, हुंडई ...


टाटा सिएराची बुकिंग १६ डिसेंबरपासून सुरू होणार असून, १५ जानेवारी २०२६ पासून ग्राहकांना तिची डिलिव्हरी मिळू लागेल.

कारची दमदार ताकद

टाटा सिएराने ११.४९ लाख रुपये (एक्स-शोरूम, पेट्रोल व्हेरियंट) या सुरुवातीच्या किमतीत दमदार फीचर्स दिले आहेत. या कारमध्ये १,४९८ सीसी क्षमतेचे इंजिन आहे. हे इंजिन १०५ बीएचपी (BHP) ताकद आणि १४५ एनएम (NM) टॉर्क निर्माण करते. कारमध्येस्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन (Manual Transmission) देण्यात आले आहे. पेट्रोलची क्षमता ५० लीटर असून, यात ६२२ लीटरची जबरदस्त बूट स्पेस (Boot Space) मिळते.


टाटा ने फिर चलाया सिएरा का जादू, धांसू फीचर्स वाली दमदार SUV लॉन्च; जानिए  कितनी है कीमत | Tata Sierra Launched in India with Bold Design and Premium  Features

हेही वाचा