मेरी डिकोस्टाच्या नावाने व्हायरल झालेल्या पोस्टने खळबळ

नवी दिल्ली : भारताच्या स्टार क्रिकेटर (Cricketer) स्मृती मानधना (Smriti Mandhana) व पलाश मुच्छलचे (Palash Muchhal) लग्न (Marriage ठरले होते. हळदही झाली होती. मात्र, हे लग्न स्मृतीचे वडील आजारी असल्याचे सांगत पुढे ढकळण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
त्यातच ‘मला केवळ पलाश मुच्छलचा खरा चेहरा पुढे आणायचा होता, मी स्मृतीचा प्रशंसक’ या मेरी डिकोस्टाच्या (Mary D Costa) नावाने व्हायरल झालेल्या पोस्टने खळबळ उडवून दिली आहे.
स्मृती व पलाश यांच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांचे फोटो सामाजीक माध्यमांवर व्हायरल झाले होते. त्यानंतर अचानक लग्न पुढे ढकळण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. वडिलांची तब्येत बिघडल्याचे कारण सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर पलाशच्या फ्लर्टी चॅट्सचे स्क्रिनशॉर्ट्स व्हायरल झाले.
व्हायरल झालेले चॅट्स हे मेरी डिकॉस्टा या युवतीसोबतचे होते. त्यानंतर पलाशने स्मृतीला धोका दिल्याची चर्चा सुरू झाली. अशातच आता मेरी डिकॉस्टाच्या नावाचे पोस्ट व्हायरल झाले व गोंधळ आणखी वाढला आहे.
त्यात मेरीने आपण पलाशला कधीच भेटले नसल्याचे म्हटले आहे. मग भेट झाली नसताना पलाशने मेरीला डीएम का केला? स्मृतीशी रिलेशनशिपमध्ये असतानाही तिच्याशी फ्लर्ट कार करीत होता? असे प्रश्न नेटकरी विचारू लागले आहेत.
नेमके काय आहे चॅट्समध्ये?
एका मेसेजमध्ये मे २०२५ मध्ये पलाश मुच्छल मेरी डिकोस्टाला एकत्र पोहायला जावूया असे सांगतो. त्यावेळी त्याला तून रिलेशनमध्ये असल्याचे विचारते. पलाश मेरीचा प्रश्न टाळून तिला स्पष्ट उत्तर देण्याऐवजी वेगळ्याच गप्पा सांगतो व होकार मिळवण्याचा प्रयत्न करतो. या चॅट्सची माहिती स्मृतीला समजल्यानंतर पलाश व स्मृतीमध्ये तिढा निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे.
त्यानंतर लग्न पुढे ढकळण्यात आल्याची घोषणा करण्यात आली व स्मृतीने प्रीवेडिंग, लग्नापूर्वी करण्यात आलेल्या सोहळ्यांचे सर्व फोटो हटवले. त्यानंतर पलाश स्मृतीची फसवणूक करीत असल्याची चर्चा नेटकरी करू लागले. लग्न नेमके का पुढे ढकळले व पुढे काय यासंदर्भात पलाश व स्मृतीकडून अजून काहीच प्रतिक्रिया आलेली नाही.