
साहित्य:
* १/२ किलो खिमा
* २ कांदे
* ४ हिरव्या मिरच्या
* १/२ चमचा हळद
* ७ ते ८ लसूण पाकळ्या
* १ चमचा गरम मसाला
* १ चमचा बेसन
* १ लिंबू
* १ चमचा तूप
* १ मोठा कांदा
* ३ अंडी, कोथिंबीर, पुदिना, चवीनुसार मीठ, तेल.
कृती:
खिमा स्वच्छ करून कोरडा करून घ्या. कांदे बारीक चिरून घ्या. आले, लसूण, मिरच्या बारीक चिरून घ्या. बेसन कोरडेच परतून घ्या.
तूप तापवून त्यात खिमा पाच मिनिटे परतावा. रंग बदलू लागला की त्यात हळद व मीठ घालावे व नंतर लगोलग १० मिनिटे झाकण न ठेवता शिजू द्यावे व थंड झाल्यावर त्याला बारीक करून घ्यावा. नंतर त्यात कांदा, आले, लसूण, मिरच्या, गरम मसाला, लिंबाचा रस, भाजलेले बेसन हे सर्व घालून मऊसर असे मिश्रण करावे.
अंडी उकडून घ्यावी व सोलून बारीक करावी. १ कांदा बारीक चिरावा. तसेच कोथिंबीर, पुदिना बारीक चिरून घ्यावा. अंडे व सर्व एकत्रित करून घ्यावे. नंतर खिम्याचा गोळा घेऊन त्याची वाटी वळावी. त्यात अंड्याचे मिश्रण ठेवून वाटी बंद करावी. त्याला कबाबचा गोल फुगीर आकार द्यावा. याप्रमाणे सर्व कबाब करून नंतर पॅनमध्ये तेल किंवा तूप घालून हे सर्व तळून घ्यावे. गरम कबाब कांद्याच्या चकत्या, लिंबू व पुदिना चटणी बरोबर खाण्यास द्यावे.

- शिल्पा रामचंद्र