कृष्णाची साधना

आनंददायीपणा आणि अप्रियता हे दोन्ही एकाच व्यक्तीबाबत घडू शकतात. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी सुसंगत असता आणि त्याच्याकडे किंवा तिच्याकडे पाहता, तेव्हा तिथे आनंददायीपणा असेल.

Story: विचारचक्र |
3 hours ago
कृष्णाची साधना

प्रश्न : नमस्कार, सद्गुरू. आत्मज्ञान प्राप्ती पूर्वी कृष्णाने काही साधना केली होती का? कोणत्या गोष्टीने त्याला या जीवनात अशा स्थितीत आणले?

सद्गुरू : एखाद्या माणसासाठी प्रत्येक दिवशी सकाळी जागे होण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत केवळ आनंदात आणि प्रेमात राहणे, ही एक प्रचंड साधना आहे. बहुतेक लोक कोणी आसपास असताना हसतात, पण जेव्हा ते एकटे असतात आणि त्यांना कोणी पाहत नाही असे वाटते, तेव्हा त्यांचा उदास चेहरा सर्व काही सांगून जातो. जर तुम्ही एकटे राहू शकत नसाल, तर याचा अर्थ स्पष्टपणे असा आहे की, तुम्ही वाईट संगतीत आहात.

लोकांमध्ये मिसळणे हे एका उत्सवासारखे आहे, परंतु अस्तित्व हे नेहमी एकटेपणात असते. जर तुम्ही स्वतःला एक सुंदर व्यक्ती बनवली, तर इथे नुसते बसून राहणे देखील अद्भुत आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणात प्रेमळ असणे - केवळ एखादी विशिष्ट परिस्थिती उद्भवली किंवा तुम्ही एखाद्या विशिष्ट व्यक्तीला पाहिले तरच नाही - जर तुम्ही फक्त, निःस्वार्थपणे प्रेम करत असाल, तर तुमची बुद्धिमत्ता पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने फुलते. निवड करण्याने, बुद्धी अपंग होते. प्रेमळ असणे हे दुसऱ्या कोणासाठी एखादी भेट नाही. ती स्वतःसाठी एक सुंदर गोष्ट आहे. ती तुमच्या प्रणालीचा आनंददायीपणा आहे - तुमची भावना, मन आणि शरीर स्वाभाविकपणे आनंददायी होतात. आणि आज हे सिद्ध करण्यासाठी पुष्कळ वैज्ञानिक पुरावे आहेत की, जेव्हा तुमची प्रणाली आनंददायी असते, तेव्हाच तुमची बुद्धी सर्वोत्तम कार्य करते.

पूर्णपणे सुसंगत

तुम्हाला दिसून येईल की, तुम्ही आरामशीर असताना तुमचे हृदय दर मिनिटाला ६० वेळा धडधडते, मग तुम्ही या पृथ्वीसोबत सुसंगत आहात. बहुतेक लोक निरोगी आणि चांगले असताना ६५ आणि ७५ दरम्यान असतात. जर तुम्ही सूर्य नमस्कार आणि शांभवी महामुद्रा सारखे काही साधे योगिक सराव सुमारे १८ महिने केले, तर ते ६० होईल - तुम्ही सुसंगत असाल. जेव्हा तुम्ही सुसंगत असता, तेव्हा आनंदी असणे हे स्वाभाविक आहे, कारण मानवाला अशा प्रकारेच घडवले गेले आहे. तो फुलण्यासाठी घडवला गेला आहे. हीच कृष्णाची साधना होती - तो त्याच्या आजूबाजूच्या जीवनाशी पूर्णपणे सुसंगत होता. बालपणी त्याने कोणतेही खेळ खेळले असले तरी, तो अद्भुतपणे सुसंगत होता. त्याने लोकांच्या घरातून लोणी चोरले आणि सगळ्या प्रकारचा खोडकरपणा केला, असे असूनही सर्वांनी त्याच्यावर प्रेम केले, या वस्तुस्थितीचा अर्थ असा की, कशातरी प्रकारे त्याने त्यांना स्वतःशी सुसंगत केले. जेव्हा तुम्ही कोणाशी सुसंगत असाल, तेव्हाच तुम्हाला त्यांच्या उपस्थितीत आनंददायी वाटेल. आनंददायीपणा आणि अप्रियता हे दोन्ही एकाच व्यक्तीबाबत घडू शकतात. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी सुसंगत असता आणि त्याच्याकडे किंवा तिच्याकडे पाहता, तेव्हा तिथे आनंददायीपणा असेल.

त्याच्या उद्देशाची आठवण

वयाच्या १६ वर्षांपर्यंत, कृष्णाची साधना त्याच्या आजूबाजूच्या जीवनाशी सुसंगत राहण्याची होती. नंतर त्याचे गुरु सांदीपनी आले आणि त्याला त्याच्या जीवनाचा हेतू मोठा असल्याची आठवण करून दिली. यामुळे कृष्णाचा आंतरिक संघर्ष झाला. त्याला तो राहत असलेले गाव आवडत होते, आणि सर्वांना तो आवडत होता. तो त्याच्या आजूबाजूच्या प्रत्येकाशी आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पूर्णपणे गुंतलेला होता - पुरुष, स्त्री, प्राणी आणि मुले. त्याने म्हटले, "मला कोणताही मोठा हेतू नकोय. मला फक्त या गावात राहायला आवडतं. मला गाई, गवळी, गोपी आवडतात. मला त्यांच्याबरोबर नाचायला आणि गायला आवडतं." पण सांदीपनींनी म्हटले, "तुला उभे राहावे लागेल, कारण हाच हेतू आहे ज्यासाठी तू जन्माला आला आहेस. हे घडणे आवश्यक आहे."

कृष्ण गेला आणि गोवर्धन पर्वत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका छोट्या टेकडीवर उभा राहिला. जेव्हा तो खाली आला, तेव्हा तो पूर्वीचा मुलगा राहिला नव्हता. तो स्वतःबद्दलच्या एका वेगळ्या गंभीरतेने खाली आला. लोकांना माहित झाले होते की, काहीतरी अद्भुत घडले आहे, पण कितीही अद्भुत असले तरी, त्यांना हे जाणवले होते की, ते त्याला गमावणार आहेत. जेव्हा त्यांनी त्याच्याकडे पाहिले, तेव्हा तो अजूनही त्यांच्याकडे पाहत हसत होता, पण त्याच्या डोळ्यात प्रेम नव्हते - तिथे ध्येय होते. त्याने अशा गोष्टी पाहिल्या ज्याची तो कल्पनाही करू शकत नव्हता.

ही आठवण करून दिल्यानंतर, त्याचा पहिला पराक्रम म्हणजे त्याचा मामा, कंस याला मारणे आणि यादवांवरील त्याचा जुलूम संपवणे हा होता. नंतर तो त्याचा भाऊ बलराम याच्यासोबत त्याचे गुरु, सांदीपनी यांच्या आश्रमात गेला आणि पुढील सात वर्षे ब्रह्मचाऱ्याचे जीवन जगला. २२ वर्षांचा होईपर्यंत, त्याने प्रखर आध्यात्मिक साधना केली.

वेगळ्या स्वरूपाची साधना

कृष्णाची साधना वेगळ्या आयामाची आणि स्वरूपाची होती. सांदीपनींनी ती अशा प्रकारे आखली होती की, ती बहुतांशी आंतरिक स्वरूपाची होती. कृष्ण द्वापारयुगाशी संबंधित नव्हता - तो सत्ययुगाचा असल्यासारखा जगला आणि वागला - त्याच्यासाठी सर्व काही मानसिक पातळीवर घडून आले. सांदीपनींना मार्गदर्शक सूचना देण्यासाठी तोंड उघडण्याची गरज नव्हती. सर्व संवाद मानसिकरित्या साधला गेला; सर्व काही मानसिकरित्या आकलन केले गेले; सर्व काही मानसिकरित्या प्राप्त केले गेले.

जेव्हा ते त्यांच्या साधनेतून बाहेर आले, तेव्हा कृष्ण आणि त्याच्या भावामध्ये फरक सुस्पष्ट होता. बलराम प्रचंड आणि पिळदार स्नायूंचा झाला, पण कृष्ण शारीरिकदृष्ट्या जसा होता तसाच राहिला. बलराम त्याला चिडवायचा, "मी एक महान योद्धा झालोय. तू अजूनही असा कसा दिसतोस?" पण तरीही, कुस्तीच्या आखाड्यात किंवा तिरंदाजी स्पर्धेत, कोणीही कृष्णाला हरवू शकत नव्हते. तलवारबाज म्हणून, खूप कमी लोक त्याच्या जवळपास फिरकू शकत होते. पण तो पिळदार स्नायूंचा झाला नाही, कारण त्याची साधना पूर्णपणे मानसिक होती, आणि ती त्याने त्याच्या जीवनात लाखो वेगवेगळ्या प्रकारे दाखवली.


सद््गुरु

(ईशा फाऊंडेशन)