मंत्री, आयएएस अधिकारी, अभियंत्यांना दिले १७ कोटी

पूजा नाईकचा आरोप : पैशाच्या बदल्यात नोकरी घोटाळा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
मंत्री, आयएएस अधिकारी, अभियंत्यांना दिले १७ कोटी

पणजी : कोट्यवधी रुपयांच्या पैशांच्या बदल्यात नोकरी घोटाळ्यातील प्रमुख संशयित पूजा नायक हिने थेट मंत्र्यावर, आयएएस अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंत्याला पैसे दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रुडंट वाहिनीशी बोलताना तिने हा धक्कादायक खुलासा केला. या आरोपांमुळे सरकारी वर्तुळात आणि मंत्र्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

२०१९ साली सुरू झालेल्या या नोकरभरती घोटाळ्याची मोठी चर्चा राज्यभर रंगली होती. चौकशीदरम्यान अनेक जणांना अटक करण्यात आली होती तसेच काही सरकारी कर्मचाऱ्यांवरही कारवाई झाली होती. मात्र, आता अनेक वर्षांनंतर या प्रकरणातील मुख्य संशयित पूजा नायक हिने पुन्हा एकदा नवीन आरोप केले आहेत.

पूजा नाईक हिने आपण एक आयएएस आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील एका वरिष्ठ अभियंत्याला नोकऱ्यांसाठी पैसे जमवून दिल्याचा पुनरूच्चार करून २४ तासांत त्यांनी पैसे परत करावेत अन्यथा पुराव्यासह मुख्यमंत्र्यांना माहिती देणार असा इशारा दिला. हा घोटाळा सुमारे १७ कोटींचा असल्याचे तिने म्हटले आहे.

हेही वाचा