पुढील काही दिवस स्थिती कायम राहण्याचे संकेत

पणजी : भारतीय हवामान खात्याने (IMD) दक्षिण व पश्चिम भारतात (South and Western India) ६ नोव्हेंबर ते पुढील काही दिवस गडगडाट, विजेच्या लकलकाटासहीत वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
गोव्यासहीत (Goa) कर्नाटक, महाराष्ट्र, तामीळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यांत त्याचा जास्त प्रभाव राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ५ ते १० नोव्हेंबरपर्यंत काही ठिकाणी ही स्थिती राहणार आहे.
कोकण व गोव्यात ६ नोव्हेंबरला काही ठिकाणी विजेचा लकलकाट व गडगडटासहीत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रातील मध्यवर्ती भागात ही स्थिती राहणार आहे. दक्षिण भारतात ही याचा प्रभाव दिसून येणार आहे.
अंदमान समुद्र व बंगाल उपसागरातील पुर्व मध्यवर्ती भागातून ताशी ३५ ते ४५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.