उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांचा मामलेदार,संयुक्त मामलेदारांना आदेश

पणजी : कोटपा कायद्याअंतर्गत (Cotpa Act) ई सिगारेटच्या (E-Cigaratte) वापरावर बंदी घालण्यात आली आहे. बंदीच्या कार्यवाहीसाठी स्थापन करण्यात आलेल्या फिरत्या पथकांनी केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकारी (North Goa District Collector) अंकीत यादव यांनी दिले आहेत.
उत्तर गोव्यातील प्रत्येक तालुक्यात मामलेदार, संयुक्त मामलेदार यांच्या अधिकारांखाली ई सिगारेटविरूद्ध कारवाईसाठी फिरत्या पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
फिरत्या पथकांनी मागणी केल्यानंतर मामलेदार, संयुक्त मामलेदारांनी वाहनांची व्यवस्था करावी. पोलीस निरीक्षकांनी छाप्यांसाठी फिरत्या पथकांना उपनिरीक्षकाची व्यवस्था करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
‘गोवा सीवीक अॅन्ड कन्ज्युमर अॅक्शन नेटवर्क’चे संघटक रोलँड मार्टिंस यांनाही पथकासोबत एक प्रतिनिधी पाठवण्याची सूचना उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.