आईच्या इच्छेसाठी गावातील २९० शेतकऱ्यांचे फेडले कर्ज

९० लाखांचे कर्ज फेडीत आईला वाहिली श्रद्धांजली

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
43 mins ago
आईच्या इच्छेसाठी गावातील २९० शेतकऱ्यांचे फेडले कर्ज

गुजरात : मुलांनी आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक समाजहिताय मार्ग निवडला. गावातील २९० शेतकऱ्यांचे ९० लाखांचे कर्ज (90 lakh rupees loan) फेडून आईला श्रद्धांजली वाहिली. त्यातून शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजाही कमी झाला.

सध्या, याची सर्वत्र चर्चा असून, आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी तब्बल ९० लाख रुपये कर्ज फेडलेल्या मुलांचे कौतुक होत आहे.

गुजरात (Gujarat) येथील अमरेली जिल्ह्यातील (Amreli District)  जिरा (Jira Village) या गावातील वरील घटना आहे. डोक्यावर वाढत जात असलेल्या कर्जाच्या बोजामुळे आत्महत्या (Suicide)  करणाऱ्या शेतकऱ्यांची (Farmers) संख्या वाढत आहे.

शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, असा संदेश देत गुजरात येथील अमरेली जिल्ह्यातील जिरा या गावातील बाबूभाई जिरावाल यांनी या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज फेडले. २९० शेतकरी गेल्या ३० वर्षांपासून कर्जाच्या ओझ्याखाली होते.

१९९५ सालापासून कर्जासंदर्भातील वाद सुरू होता. सेवा सहकारी मंडळ समितीतील तत्कालीन प्रशासकांनी शेतकऱ्यांना फसवून त्यांच्या नावावर कर्ज काढले. त्यांना माहित नव्हते. मात्र, कर्ज वाढत गेल्यावर नोटीस यायला लागली व शेतकऱ्यांना समजले.

त्यांना सरकारी मदत, कर्ज व अन्य लाभ मिळणे कठीण झाले. कर्जामुळे जमिनीचे विभाजन करणेही अशक्य बनले. कर्ज फेडलेल्या मुलांच्या आईला आपले दागिने विकून कर्ज फेडायची इच्छा होती.

आईची ही अंतिम इच्छा आम्ही दोन्ही भाऊ एकत्र आले व पूर्ण केल्याचे बाबूराव जिरावाला यांनी सांगितले. कर्ज फेडण्याची प्रक्रिया करण्यासाठी मी व भाऊ बॅंक अधिकाऱ्यांना भेटलो.

आईची इच्छा बोलून दाखवल्यावर त्यांनी सहकार्य केले व बॅंकेचे कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र देण्यास संमती दिली. शेतकऱ्यांवर एकूण ८९ लाख ८९ हजार २०९ रुपये कर्ज होते.  ते कर्ज फेडले आणि आईची अंतिम इच्छा पूर्ण करीत श्रद्धांजली वाहिल्याचे बाबूभाई यांनी सांगितले. 

हेही वाचा