आतील पेठ-डिचोली येथील बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21st October, 11:49 pm
आतील पेठ-डिचोली येथील बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला

डिचोली : आतील पेठ डिचोली येथून सोमवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या सुवर्ण दत्ता गोवेकर (४२) याचा मृतदेह मंगळवारी दुपारी पिळगाव जेटी परिसरात नदीत सापडला.

सुवर्ण गोवेकर हा युवक सोमवारी सकाळपासून घरी न आल्याने बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. मंगळवारी डिचोली पोलिसांनी विविध ठिकाणी शोध घेतला असता पिळगाव जेटीजवळ त्याची चप्पल, दुचाकी, मोबाईल सापडला. त्यानंतर अग्नीशामक दल, डिचोली पोलीस व स्थानिकांनी नदीत शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला. अग्नीशामक दलाचे अधिकारी राहुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी बोटीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी डिचोली पोलीस तपास करीत आहेत. मृतदेह शवचिकित्सेसाठी बांबोळी येथे पाठवण्यात आला.