बार्देश : म्हापसा बाजारात फुले विक्रेत्यांची ‘दिवाळी’

शेवंती ३०० रुपये किलो : झेंडूच्या फुलांना शंभर रुपयांचा दर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21st October, 11:33 pm
बार्देश : म्हापसा बाजारात फुले विक्रेत्यांची ‘दिवाळी’

म्हापसा : दिवाळी सणामुळे म्हापसा बाजारपेठेत झेंडूच्या फुलांचा भाव १०० रुपये तर शेवंतीचा दर ३०० रुपये प्रति किलो आहे. काटे कणगीचा दर २५० रुपये प्रति किलो असून भाजीपाल्याचे दर मात्र मागील आठवड्याप्रमाणेच स्थिर आहेत.

भाजीपाल्याचा किरकोळ बाजारभाव प्रति किलोप्रमाणे :

टोमॅटो ३० रुपये, बटाटा ४० रुपये, कांदा ४० रुपये, गाजर ६० रुपये, वांगी ८० रुपये, ढब्बू मिरची ८० रुपये, कोबी ४० रुपये, कॉलीफ्लॉवर ४० रुपये, दुधी ४० रुपये, चिटकी ८० रुपये, मिरची ८० रुपये, आले १२० रुपये, लसूण ३०० रुपये, भेंडी ८० रुपये. लिंबू ५ रुपये नग, पालक १५ रुपये मुळी, तांबडी भाजी २० रुपये मुळी, कोथिंबीर २० रुपये मुळी, शेपू ३० रुपये मुळी, कांदा पात २० रुपये मुळी, मेथी २० रुपये मुळी, मका ५० रुपयांना तीन नग, कारले ५० रुपये, दोडकी ८० रुपये, बीट ८० रुपये, वालपापडी १२० रुपये, वाल ८० रुपये, काकडी ५० रुपये, नारळ ४० ते ५० रुपये.

धान्ये आणि किराणा (प्रति किलो) :

तूरडाळ १२० ते १४० रुपये, चवळी १२० रुपये, मूग १२० रुपये, मसूर १०० रुपये, वाटाणे ८० रुपये, हिरवे वाटाणे १२० रुपये, हरभरे १०० रुपये, काबुली चणे १४०, सोना मसुरी तांदूळ ५० रुपये, बासमती तांदूळ ८० ते १०० रुपये, गहू ४० रुपये, नाचणी ५० रुपये, साखर ५० रुपये, चहा पावडर २८० रुपये, आटा ४५ रुपये, पाम तेल १३५ प्रति लिटर असा दर आहे.

चिकन २४० रुपये नेट किलो, मटण १००० रुपये किलो व अंडी ८० रुपये डझन.

फळे (प्रति किलो) :

सफरचंद २००-३०० रुपये, संत्रे २०० रुपये, मोसंबी २०० रुपये, पपई ६० रुपये.

मासळी :

इसवण ६०० रुपये, चणाक ५०० रुपये, पापलेट ४०० रुपये, काळे पापलेट ३०० रुपये, सुगंटा (कोळंबी) ३०० रुपये, कर्ली २०० रुपये, बांगडा १०० रुपये, टोकी २०० रुपये, लेपो ३०० रुपये, खेकडे २५० रुपये, खुबे-तिसरे १०० रुपये, वेर्ली २०० रुपये, माणक्या ३०० रुपये, दोडयारे २०० रुपये, मडसो ४०० रुपये, मुड्डुशो ७०० रुपये. 

हेही वाचा