मडगाव : जीर्ण इमारतींचा वापर धोकादायक! सुरक्षिततेची प्राथमिक जबाबदारी मालक आणि रहिवाशांची

दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
मडगाव : जीर्ण इमारतींचा वापर धोकादायक! सुरक्षिततेची प्राथमिक जबाबदारी मालक आणि रहिवाशांची

मडगाव: दक्षिण गोवा जिल्ह्यातील अनेक असुरक्षित आणि जीर्ण इमारतींचा वापर आजही निवासी आणि व्यावसायिक कारणांसाठी सुरू आहे. अशा धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करणे किंवा व्यवसाय करणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, जीवित आणि मालमत्तेला धोका असूनही काही धोकादायक इमारतींचा वापर आजही सुरू आहे. या इमारतींच्या सुरक्षिततेची सुनिश्चितता करण्याची प्राथमिक जबाबदारी संबंधित मालक आणि रहिवाशांची असेल.

नागरिकांना सल्ला देण्यात आला आहे की, कोणत्याही असुरक्षित किंवा संरचनात्मकदृष्ट्या कमकुवत इमारतीची माहिती त्वरित स्थानिक नगरपालिकेला द्यावी. जर ती इमारत नगरपालिकेच्या अधिकारक्षेत्राबाहेर असेल, तर योग्य कारवाईसाठी संबंधित गट विकास अधिकाऱ्यांकडेतक्रार नोंदवावी. दरम्यान, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी हेल्पलाइन नंबर ११२ किंवा दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाला (०८३२ -२७९४१००) या क्रमांकावर कॉल करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

हेही वाचा