सकाळच्या गडबडीत आपल्याला एक प्रश्न पडतो तो म्हणजे झटपट होणार नाश्ता कुठला? ही रेसिपी तुम्ही पाच मिनिटामध्ये करू शकतात. चला तर आज काय आहे ते पाहूया.

साहित्य:
१ मोठी वाटी गव्हाचे पीठ
२ बारीक चिरलेले कांदे
२ बारीक चिरलेले टोमॅटो
१ बारीक चमचा जिरं
१ बारीक चमचा ओवा
१ ते २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
२ मोठे चमचे किसलेलं खोबरं
१ बारीक चमचा हळद
१ बारीक वाटी बारीक रवा
१ चमचा मॅजिक मसाला
खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीनुसार मीठ
तेल
कृती:
प्रथम एका भांड्यात गव्हाचे पीठ, बारीक चिरलेले कांदे, बारीक चिरलेले टोमॅटो घ्या आणि हे सगळे जिन्नस छान एकत्र करा. आता यात जिरं, ओवा, बारीक चिरलेल्या मिरच्या, खोबरं, हळद, बारीक रवा, मॅजिक मसाला हे सगळं घाला व एकत्र करा. मग यात कोथिंबीर, चवीनुसार मीठ, पाणी घाला, पुन्हा एकत्र करा. पाणी थोडं थोडं घाला. नाहीतर पीठाचे गोळे होऊ शकतात. जरा जाडसर असे हे मिश्रण करा. आता घावने काढायला तवा तापत ठेवा. तवा तापला की तेल लावा आणि हे मिश्रण तव्यावर छान पसरवा. मग गॅसवर हे घावन भाजून घ्या. एका बाजूने भाजले की दुसऱ्या बाजूने परता. पुन्हा तेल घाला व दोन्ही बाजूने कुरकुरीत, सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.अश्या प्रकारे सगळे घावने भाजून घ्या. हे घावने तुम्ही खोबरं, चटणी, टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकतात. नक्की करून पहा.
