अनमोड घाटात मारुती व्हॅनला धडक दिल्यानंतर ट्रक थेट दरीत कोसळला; चालक जखमी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
अनमोड घाटात मारुती व्हॅनला धडक दिल्यानंतर ट्रक थेट दरीत कोसळला; चालक जखमी

बेळगाव : बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण भाग असलेल्या अनमोड घाटात एका मालवाहू ट्रकने मारुती व्हॅनला मागून धडक दिल्याची गंभीर घटना घडली. या धडकेनंतर ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट खोल दरीत कोसळला.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड घाटाच्या वळणावर घडला. ट्रकने व्हॅनला धडक दिल्यानंतर ट्रक दरीत कोसळला, मात्र सुदैवाने व्हॅनमधील सर्व प्रवासी या अपघातातून सुखरूप बचावले, त्यांना कोणतीही गंभीर इजा झालेली नाही. ट्रक चालक, आनंद राठोड (रा. होस्पेट), या अपघातात जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, अधिकाऱ्यांनी वाहनचालकांना विशेष सूचना दिली आहे. खराब हवामान किंवा रस्ते निसरडे झालेले असताना घाट क्षेत्रात अत्यंत सावधगिरीने वाहने चालवावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


हेही वाचा