मुरगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या गोव्यात

व्हीव्हीआयपी दौऱ्यामुळे ४ ऑक्टोबर रोजी मुरगावातील मार्गांवरील वाहतूकीवर निर्बंध.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
मुरगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या गोव्यात

पणजी: गोव्यात ४ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या व्हीव्हीआयपी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गांवर काही मोठे बदल आणि निर्बंध लागू केले आहेत, ज्यामुळे वाहतुकीत बदल होणार आहेत. दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत पुढील मार्गांवर वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत:

* जड वाहनांना बंदी: एनएच ५६६ (सडा-बिर्ला क्रॉस जंक्शन), एनएच ३६६ (वास्को-चिखली-कुठ्ठाळी) आणि एनएच ६६ (टायटन जंक्शन-कुठ्ठाळी) या महामार्गांवर जड वाहनांच्या वाहतुकीला परवानगी दिली जाणार नाही.

* पार्किंग निर्बंध: नागरिकांनी चिखली सर्कल ते कुठ्ठाळी सर्कल दरम्यान एनएच ३६६ आणि एनएच ५६६  तसेच एनएच ६६  च्या रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी करू नयेत. वाहतुकीस अडथळा आणणारी वाहने ओढून नेली जातील.

* वाहतूक डायवर्जन : वास्कोकडून वेर्णा-मडगावच्या दिशेने जाणारी वाहने मांगोर हिल-वरुणापुरी-शांतीनगर या मार्गावरून वळवली जातील. तसेच, वास्को/मुरगावच्या दिशेने येणारी वाहने कुठ्ठाळी सर्कल येथील बिर्ला क्रॉस जंक्शनवरून वळवली जातील. दुपारी २ वाजेनंतर चिखली सर्कल ते कुठ्ठाळी सर्कल-नवीन झुआरी पूल या मार्गांवर वाहतूक प्रभावित होईल.


हेही वाचा