गुंडांकडून रामा काणकोणकरवर हल्ला; पाच जणांना अटक

करंजाळेत घडली दिवसाढवळ्या घटना : तोंडाला शेण फासून केबलने जबर मारहाण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th September, 11:43 pm
गुंडांकडून रामा काणकोणकरवर हल्ला; पाच जणांना अटक
Image 1 Image 2 Image 3 Image 4 Image 5
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही तासांतच ५ सराईत गुन्हेगारांना अटक केली. करंजाळे येथे गुरुवारी दुपारी रामा काणकोणकर यांच्यावर सहा जणांनी मिळून प्राणघातक हल्ला केला होता. हल्लेखोरांनी प्रथम त्यांच्या तोंडाला शेण फासले आणि नंतर केबलने जबर मारहाण केली. हल्लखोर सांताक्रुझचे असून ते सराईत गुन्हेगार (हिस्ट्री शिटर) आहेत. यातील पाच जण काही महिन्यांपूर्वी मांद्रेत एका माजी सरपंचावर झालेल्या हल्ल्यात सहभागी होते.
👊
हल्ल्याचा तपशील आणि गुन्हेगारांची पार्श्वभूमी
तक्रारीतील धक्कादायक माहिती
तोंडात शेण फासून मारहाण
रामा काणकोणकर यांचे मित्र सोयरू वेळीप यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हल्लेखोरांनी प्रथम त्यांच्या तोंडाला शेण फासले आणि 'तुला गोंयचो राखणदार व्हायचे आहे का?' असे विचारत केबलने अमानुष मारहाण केली.
पिस्तूल आणि चाकूचा धाक
हल्लेखोरांपैकी एकाने पिस्तूल तर दुसऱ्याने चाकूचा धाक दाखवून रामा यांना धमकावले, अशी माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.
हल्लेखोरांचे व्हिडिओ चित्रीकरण
हा संपूर्ण हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, हल्लेखोरांनी या मारहाणीचे मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण करून ते कोणालातरी पाठवल्याचेही दिसून आले आहे.
🚓
पोलिसांची वेगवान कारवाई
हल्ल्यातील संशयित अँथनी नादार, फ्रान्सिस नादार, मिंगेल आरावजो, मनीष हडफडकर यांच्यासह सराईत गुन्हेगार सुरेश नाईक यांना ताब्यात घेण्यात आले. दोघांना दोडामार्ग बस स्थानकाजवळून, तर तिघांना कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत असताना मडगाव रेल्वे स्थानकावरून पकडले. फरार असलेल्या सहाव्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या रामा यांना नागरिकांच्या मदतीने बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. काणकोणकर यांची प्रकृती सुधारत आहे.
#GoaNews #Crime #PanajiPolice #RamaKankonkar #Goa