मिरामार किनाऱ्यावर कचरा कुंड्या नसल्याने नाराजी
मिरामार समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात व इतर.
...
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मिरामार समुद्रकिनाऱ्याकडे पर्यटन खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. मिरामार ते करंझाळेपर्यंत मला कचराकुंडी दिसली नाही. समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या लोकांनी आणि पर्यटकांनी कचरा टाकायचा कुठे, असा सवाल उपस्थित करून महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सरकारला ‘घरचा अहेर’ दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत भाजपतर्फे देशभरात ‘सेवा पखवडा’चे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत पणजीतील भाजपने बुधवारी मिरामार किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम हाती घेतली. या मोहिमेत मंत्री बाबूश मोन्सेरात सहभागी झाले होते. या उपक्रमात पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, उपमहापौर संजीव नाईक, पणजी भाजप मंडळाचे अध्यक्ष पुंडलिक शेट्ये, उपाध्यक्ष शांताराम नाईक, तसेच पणजीचे नगरसेवक व भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते.