महेश देसाई अध्यक्ष; देसाई पॅनलने ठोकला षटकार, परिवर्तन पॅनल पराभूत

गोवा क्रिकेट संघटनेत देसाई पॅनलचे वर्चस्व : सर्व सदस्य विजयी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
49 mins ago
महेश देसाई अध्यक्ष; देसाई पॅनलने ठोकला षटकार, परिवर्तन पॅनल पराभूत
गोवा क्रिकेट संघटनेच्या (GCA) बहुप्रतिक्षित निवडणुकीत चेतन देसाई यांच्या पॅनलने भाजप पुरस्कृत 'परिवर्तन पॅनल'चा दारुण पराभव करत निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. अध्यक्षपदाच्या थेट लढतीत महेश देसाई यांनी महेश कांदोळकर यांचा पराभव केला. देसाई पॅनलने सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवत GCA वर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे.
🏆
जीसीएची नवी कार्यकारिणी (देसाई पॅनल)
  • अध्यक्ष: महेश देसाई
  • उपाध्यक्ष: परेश फडते
  • सचिव: तुळशीदास शेट्ये
  • सहसचिव: अनंत नाईक
  • खजिनदार: सय्यद अब्दुल माजिद
  • सदस्य: महेश बेहकी
🗳️
निवडणुकीचे विश्लेषण
१०७ क्लब प्रतिनिधींनी बजावला हक्क
अनुभवाला मतदारांची पसंती
एकीकडे बीसीसीआयचे सहसचिव रोहन गावंस देसाई यांचे आव्हान असताना, मतदारांनी चेतन देसाई आणि विनोद फडके यांच्या गटाच्या अनुभवाला स्पष्ट कौल दिला.
नव्या कार्यकारिणीसमोर आव्हान
या दणदणीत विजयानंतर आता नवनिर्वाचित अध्यक्ष महेश देसाई आणि त्यांच्या कार्यकारिणीसमोर धारगळ येथे आंतरराष्ट्रीय स्टेडियम उभारण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
#GoaNews #GCAElection #GoaCricket #SportsPolitics #Panaji
हेही वाचा