•
मडगाव : गॅस सिलेंडरचे पैसे ग्राहकांकडून ऑनलाइन पद्धतीने स्वतःच्या बँक खात्यात जमा करून गॅस एजन्सीची ₹ ३.२७ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी डिलिव्हरी बॉयविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाणावली येथील सालसेत गॅस एजन्सीमध्ये हा प्रकार घडला असून, संशयित विश्वनराम पुनिया (१९, रा. राजस्थान) याच्यावर कोलवा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
💸
कशी केली फसवणूक?
ऑनलाइन पेमेंटचा गैरवापर
स्वतःच्या खात्यात घेतले पैसे
संशयित पुनिया हा गॅस सिलेंडर पोहोचवल्यावर, ग्राहकांना ऑनलाइन पेमेंटसाठी स्वतःचा बँक खाते क्रमांक देत होता.
एजन्सी मालकाची तक्रार
१६ जून ते २० जुलै दरम्यान हा प्रकार घडला. एजन्सी मालक लेरशा पिमेंता यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला.
पोलिसांकडून तपास सुरू
कोलवा पोलिसांनी संशयित विश्वनराम पुनिया विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.


