•
मडगाव : दक्षिण गोव्यातील बेकायदेशीर वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून, तालुकास्तरावर विशेष भरारी पथकांची स्थापना केली आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी या पथकांची स्थापना केली असून, नागरिकांना बेकायदेशीर वाळू उपशाबाबत थेट या पथकांकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
🚜
प्रशासनाचा कृती आराखडा
वाळू माफियांवर नजर
सात तालुक्यांमध्ये पथके तैनात
सासष्टी, केपे, फोंडा, काणकोण, धारबांदोडा, सांगे आणि मुरगाव या सात तालुक्यांमध्ये मामलेदारांच्या नेतृत्वाखाली ही पथके स्थापन करण्यात आली आहेत.
अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश
जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
📢
नागरिकांनी थेट तक्रार करावी
आपल्या परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खननाची तक्रार थेट तालुकास्तरीय भरारी पथकाकडे कॉल करून किंवा व्हॉट्सॲप संदेशाद्वारे करावी. तक्रारीसोबत घटनेचा फोटो आणि ३० शब्दांपर्यंतची माहिती पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.