•
म्हापसा : कोलवाळ येथील गोटणीचोव्हाळमध्ये शनिवारी दुपारी रोडरेजच्या एका संतापजनक प्रकारात कोल्हापूरमधील पर्यटकांवर हल्ला करण्यात आला. किरकोळ वादातून एका स्थानिकाने पर्यटकांना दगडफेक करून जखमी केले आणि त्यांच्या इनोव्हा कारची तोडफोड केली. याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी संशयित रशीद मोहम्मद सिद्दीकी याला अटक केली आहे.
😠
कसा घडला प्रकार?
वाद, हल्ला आणि त्यानंतर...
किरकोळ वादातून सुरुवात
अरुंद रस्त्यावर पार्क केलेल्या इनोव्हा कारमुळे अडथळा झाल्याने दुचाकीस्वार संशयिताने प्रथम गाडीचा मागचा आरसा तोडला.
नुकसान भरपाई मागताच हल्ला
जाब विचारताच संशयिताने मोठा दगड उचलून कारच्या पुढच्या काचेवर फेकला आणि पर्यटकांवर दगडफेक सुरू केली, ज्यात दोघे जखमी झाले.
स्वतःला जखमी केले
घटनेनंतर संशयिताने स्वतःच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडून जखमी करून घेतले. पोलिसांनी त्याला रुग्णालयातून ताब्यात घेतले.
⚠️
संशयित आरोपी खून प्रकरणातील
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेला संशयित रशीद अली सिद्दीकी हा करासवाडा येथे फेब्रुवारी २०१६ मध्ये झालेल्या कलीम शेख खून प्रकरणातील संशयित आरोपी आहे.