आकाशवाणीच्या समाचार विभागाने आपल्या देशभरातील समाचार विभागांसाठी एक सुंदर स्टाईल बूक तयार केला आहे. लोकमत तयार करण्यासाठी आकाशवाणीचा देशभर सहभाग व्यापक आहे त्यावर चर्चा आहे. आकाशवाणी वृत्त विभागाचा हा ‘स्टाईल बूक’ मार्गदर्शक व दिशानिर्देशन करणारा दीपस्तंभ आहे.
अाकाशवाणीच्या समाचार विभागाने आपल्या देशभरातील समाचार विभागांसाठी एक सुंदर स्टाईल बूक तयार केला आहे. आकाशवाणीच्या बातम्या कशा लिहाव्या, संपादित कराव्या, त्याची विस्वासार्हता व स्रोत कसे तपासून घ्यावे, भाषाशैली अशा विविध बाबींवर सविस्तर माहिती दिलेली आहे. कैक वर्षांच्या यात्रेतून हा समाचार विभाग गेला आहे. अनुभव व्याप्ती फार मोठी आहे. त्यामुळे हा ग्रंथ सुटसुटीत आणि उद्बोधक बनला आहे.
वर्तमानपत्रात दिसणाऱ्या बातम्या आणि रेडिओवर ऐकल्या जाणाऱ्या किंवा टेलिव्हिजनवर पाहिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये एक मूलभूत फरक म्हणजे प्रसारित प्रत डोळ्यांसाठी नाही तर कानांसाठी लिहिली जाते. वर्तमानपत्र वाचताना, वाचकाला त्याला वाचायच्या असलेल्या कथा प्रथम निवडण्याची सुविधा असते आणि कथा असूनही, तो अर्ध्या वाटेवर थांबून सुरुवातीपर्यंत परत जाऊन मुद्दा समजून घेऊ शकतो. परंतु रेडिओ आणि टेलिव्हिजनच्या बाबतीत प्रसारित झालेल्या बातम्यांकडे परत जाता येत नाही. ही गोष्ट पहिल्याच प्रकरणात स्पष्ट केली आहे.
श्रोता एकतर संपूर्ण बुलेटिन ऐकतो किंवा त्यातील काही भाग चुकवतो, तो वेळेत परत जाऊ शकत नाही. जर श्रोत्याला एखादा कठीण शब्द किंवा वाक्यांश समजत नसेल, तर त्याला वर्तमानपत्र वाचकाप्रमाणे शब्दकोशाचा सल्ला घेण्याचा कोणताही मार्ग नाही. वेळ नाही. अशा परिस्थितीत, जर त्याला बातम्यांचे कास्ट गोंधळात टाकणारे किंवा रंजक वाटत नसेल तर रेडिओ बंद करणे हा एकमेव पर्याय असतो. बातम्यांची भाषा समजण्यास सोपी असावी. काही रेडिओ प्रतिनिधी किंवा पत्रकार प्रसारणासाठी योग्य पद्धतीने प्रत लिहित असतील परंतु श्रोत्यापर्यंत पोहोचणाऱ्या बातम्यांचा मोठा भाग वृत्तसंस्थांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित असतो. यामुळे वृत्तसंस्थांकडून मिळालेल्या प्रती पुन्हा लिहिणे आवश्यक असते.
या बूकमध्ये आणखीन एक गोष्ट स्पष्ट केली आहे. प्रसारण प्रत कानासाठी असल्याने, एक आवश्यक पूर्वअट म्हणजे ती संभाषणात्मक असावी कारण श्रोत्याला ती ऐकण्याची फक्त एकच संधी असते. प्रसारण प्रत बोलल्या जाणाऱ्या भाषेत, स्पष्टपणे आणि सोप्या पद्धतीने लिहिली पाहिजे. विविध प्रकारचे लोक बातम्या ऐकत असल्याने, वृत्तकथा सामान्य लोकांना सहज समजेल अशी असावी. भाषा स्पष्ट असावी म्हणजे ती लगेच श्रोत्याला सहज समजेल.
जाड गुळगुळीत चांगल्या प्रतीचा कागद वापरलेला असल्याने हा स्टाईल बूक सुमार दोन किलो तरी झाला असेल. त्याची रचनाही आडव्या स्वरूपाची असल्याने सुबक झाली आहे. सुमारे तेरा प्रकरणं आहेत. त्यात आकर्षक स्टुडियोचे फोटो व इतर वृत्त निर्मिती कशी होते तो स्टेप बाय स्टेप नकाशा व चार्ट (तक्ता) आहे.
मसुदा तयार करताना ज्या चुका होतात, त्या बाराव्या प्रकरणात प्रत्यक्ष वारंवार घडणाऱ्या चुकांवर प्रकाश टाकला आहे. हे पुस्तक इंग्रजीत आहे. इंग्रजीतील बुलेटिनच्या चुकांवर ऊहापोह केलेला आहे. साधे शब्द कसे वापरावे त्यावर शेवटी एक जोडपत्र पुरवणी आहे.
संसदीय कामकाज व विधानसभेतील कामकाज वृत्तांकन यांचा छान नमुना दिलेला आहे. त्यावरून प्रतिनिधी, वृत्त संपादक व वृत्त निवेदक यांना एक स्पष्टता मिळते.
निवेदक, संपादक, रिपोर्टर व इतरांनी काय करू नये, काय करावं हे सर्व मुद्दे क्रमवार या ग्रंथात आहेत. संगणकीय न्यूजरूम या विषयात तांत्रिक बाबींविषयी माहिती आहे. प्रादेशिक भाषेतील बातम्यांचा श्रोतावर्ग फार मोठा असतो. तिथं भाषेचं व्याकरण, शुद्धता कशी बाळगावी यावर मार्गदर्शन आहे.
संध्याकाळी दिवसभरात काय घडलं हे ऐकण्यासाठी लोक आतुर असतात. त्यांना छान पध्दतीने ते देणं महत्त्वाचं असतं असं एका प्रकरणात आहे. लोकमत तयार करण्यासाठी आकाशवाणीचा देशभर सहभाग व्यापक आहे त्यावर चर्चा आहे. आकाशवाणी वृत्त विभागाचा हा स्टाईल बूक मार्गदर्शक व दिशानिर्देशन करणारा दीपस्तंभ आहे.
मुकेश थळी
(लेखक बहुभाषी साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत)