कांद्याच्या वाटणातलं झणझणीत चिकन फ्राय

घरगुती स्वयंपाकात कांद्याचं वाटण ही गोष्ट रोजचीच असते. पण तुम्हाला माहीत आहे का, ह्याच साध्या वाटणामध्ये थोडासा मसाला आणि थोडीशी ट्रिक वापरली, तर अगदी रेस्टॉरंटला तोड देणारं झणझणीत चिकन फ्राय तयार करता येतं. आज आपण अशीच एक सोप्पी पण चविष्ट रेसिपी पाहणार आहोत.

Story: चमचमीत रविवार |
3 hours ago
कांद्याच्या वाटणातलं झणझणीत चिकन फ्राय

लागणारे साहित्य 

(४ लोकांसाठी)


चिकन : ५०० ग्रॅम (मध्यम तुकडे केलेले)

कांदा : ३ मोठे (बारीक चिरून वाटण केलेले)

आले : १ इंच तुकडा

लसूण पाकळ्या : ७ ते ८

कोथिंबीर : अर्धा जुडी

हळद : अर्धा टीस्पून

लाल तिखट : २ टेबलस्पून

गरम मसाला : १ टेबलस्पून

मीठ : चवीनुसार

लिंबाचा रस : १ टेबलस्पून

तेल : ४ टेबलस्पून

पाणी :  अर्धा कप

कृती

मॅरिनेशन करा : सर्वप्रथम चिकनचे तुकडे स्वच्छ धुऊन एका भांड्यात घ्या. त्यात हळद, मीठ, लिंबाचा रस आणि अर्धा चमचा तिखट घालून नीट मिक्स करा. साधारण अर्धा तास तसेच झाकून ठेवा.

कांद्याचं वाटण तयार करा : कांदे, आले, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. हेच आपलं खास बेस वाटण होणार आहे.

मसाला परतून घ्या : कढईत तेल तापवा. त्यात हे कांद्याचं वाटण घालून मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. हाच टप्पा चिकनला झणझणीत आणि सुगंधी करतो.

चिकन घाला : आता मॅरिनेट केलेले चिकन तुकडे कढईत टाका. नीट मिसळा आणि ५-६ मिनिटे झाकण ठेवून शिजू द्या.

मसाले मिसळा : त्यात लाल तिखट, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून अर्धा कप पाणी टाका. झाकण ठेवून मध्यम आचेवर साधारण १५ मिनिटे शिजवा.

फ्राय करा : चिकन शिजल्यानंतर झाकण काढा आणि पाणी पूर्ण आटेपर्यंत भाजत ठेवा. तेल वर यायला लागलं की तुमचं झणझणीत चिकन फ्राय तयार आहे.

सर्व्हिंग टिप : गरमागरम भाकरी, पोळी किंवा अगदी जीरा राईससोबत हा पदार्थ अप्रतिम लागतो. वरून कोथिंबीर पसरवायला विसरू नका.

खास टिप्स : जर तुम्हाला थोडं अधिक झणझणीत हवं असेल तर हिरवी मिरची पेस्टही घालू शकता.

या रेसिपीत टोमॅटो वापरले नाहीत, त्यामुळे कांद्याचा गोडसरपणा आणि मसाल्याची झणझणीतता अगदी उत्तम लागतो.

ही रेसिपी तुम्ही अगदी खास पाहुण्यांसाठी किंवा वीकेंडच्या जेवणासाठी करून बघू शकता.

झणझणीत, सुगंधी आणि अगदी सोप्पं असं कांद्याच्या वाटणातलं चिकन फ्राय करून बघा आणि तुमच्या कुटुंबाला खूश करा.

एकदा खाल्लं की परत परत करण्याची इच्छा नक्कीच होईल! 


शिल्पा रामचंद्र