भाजप समर्थक पॅनलची प्रतिष्ठा पणाला; गोवा क्रिकेट संघटनेसाठी चुरशीची लढत

१६ सप्टेंबरला निवडणूक : ‘परिवर्तन’चा चेतन देसाई गटाशी थेट सामना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th September, 11:10 pm
भाजप समर्थक पॅनलची प्रतिष्ठा पणाला; गोवा क्रिकेट संघटनेसाठी चुरशीची लढत
पणजी : गोवा क्रिकेट संघटनेवर (जीसीए) ताबा मिळवण्यासाठी आता रोहन गावस देसाई गटाचे ‘परिवर्तन’ पॅनल आणि चेतन देसाई यांच्या पॅनलमध्ये थेट लढत होणार आहे. संघटनेची निवडणूक येत्या १६ सप्टेंबर रोजी होणार असून, अध्यक्षपदासाठी महेश देसाई आणि महेश कांदोळकर यांच्यात दुरंगी लढत होणार असल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे.
🏏
निवडणुकीतील प्रमुख गट
राजकीय पाठिंब्यापेक्षा क्लबांचा पाठिंबा निर्णायक
‘परिवर्तन’ पॅनल (भाजप समर्थक)
या पॅनलचे उमेदवार नवखे मानले जात असून, त्यांना किती क्लबांचा पाठिंबा मिळतो यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.
चेतन देसाई समर्थक पॅनल
माजी अध्यक्ष विनोद फडके, विपूल फडके, सूरज लोटलीकर अशा अनेक माजी पदाधिकाऱ्यांनी या पॅनलला पाठिंबा दिला आहे, ज्यांचा अनेक क्लबांशी चांगला संपर्क आहे.

"सर्व क्लबना बरोबर घेऊन क्रिकेटच्या विकासासाठी आमचे पॅनल रिंगणात उतरले आहे. आम्हाला क्लब्सचा चांगला पाठिंबा मिळत आहे. आंतरराष्ट्रीय स्टेडियम उभारण्यास आमचे प्राधान्य असेल."

- महेश कांदोळकर, अध्यक्षपदाचे उमेदवार, ‘परिवर्तन पॅनल’

"माझ्या पॅनलच्या समर्थक उमेदवारांनी क्रिकेटसाठी भरीव योगदान दिले आहे. विजयासाठी विशेष प्रचाराचीही पॅनलला आवश्यकता नाही."

- चेतन देसाई, माजी अध्यक्ष

🗳️ जीसीए निवडणुकीतील अंतिम उमेदवार
  • अध्यक्ष : महेश देसाई, महेश कांंदोळकर
  • उपाध्यक्ष : परेश फडते, राजेश पाटणेकर
  • सचिव : दया पागी, हेमंंत पै आंंगले, तुळशीदास शेट्ये
  • सहसचिव : अनंत नाईक, सुशांंत नाईक
  • खजिनदार : रूपेश नाईक, सय्यद माजिक
  • सदस्य : महेश बेहकी, मेघनाथ शिरोडकर
#GoaCricket #GCAElection #GoaNews #SportsPolitics
हेही वाचा