लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार प्रकरणी संशयिताची निर्दोष मुक्तता

पणजी जलदगती न्यायालयाचा निकाल : संबंध संमतीनेच असल्याचे निरीक्षण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th September, 10:46 pm
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार प्रकरणी संशयिताची निर्दोष मुक्तता
पणजी :लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपातून पणजी येथील जलदगती न्यायालयाने एका तरुणाची निर्दोष मुक्तता केली. पीडित महिला आणि संशयित यांच्यातील संबंध हे संमतीने होते आणि सुरुवातीला लग्नाचे कोणतेही वचन दिले नव्हते, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्या. दुर्गा मडकईकर यांनी नोंदवले.
⚖️
न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर, पीडित महिला आणि संशयित यांच्यातील संबंध संमतीने होते आणि सुरुवातीला लग्नाचे कोणतेही वचन दिले नव्हते, असे नमूद केले. तसेच, तक्रारदार महिला घटस्फोटित असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे स्पष्ट करून न्यायालयाने संशयित युवकाला आरोपातून मुक्त केले.
📂
प्रकरणाची पार्श्वभूमी
आरोप आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद
पीडितेचा आरोप
३४ वर्षीय युवकाने मैत्री करून २० मार्च २०२३ रोजी लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार महिलेने ३१ मे २०२३ रोजी दाखल केली होती.
बचाव पक्षाचा युक्तिवाद
अॅड. सुजय कामुलकर यांनी युक्तिवाद केला की, दोघांमधील संबंध संमतीने होते, त्यांच्यात वयाचे आणि धर्माचे अंतर होते आणि तक्रार दाखल करण्यास दोन महिन्यांचा विलंब झाला होता.
#GoaNews #CourtVerdict #Panaji #LegalNews
हेही वाचा