आगशीच्या पंच एमी फर्नांडिस अपात्र

निधीचा गैरवापर केल्याचा ठपका : निवडणूक आयोगाचा आदेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th September, 11:07 pm
आगशीच्या पंच एमी फर्नांडिस अपात्र
पणजी : गटारे स्वच्छ करणे आणि झाडे तोडण्याच्या कामासाठी निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून गोवा राज्य निवडणूक आयोगाने आगशी पंचायतीच्या पंच आणि माजी सरपंच एमी फर्नांडिस यांना अपात्र ठरवले. फर्नांडिस यांनी निविदा प्रक्रिया न करता पंचायत निधी थेट १० पंच सदस्यांच्या बँक खात्यात जमा करून हे काम करून घेतले होते.
⚖️
राज्य निवडणूक आयोगाचा आदेश
आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका ठेवत राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दौलत हवालदार यांनी एमी फर्नांडिस यांना अपात्र ठरवण्याचा आदेश दिला. पंचायत कायद्यानुसार पंचांमार्फत कामगारांना थेट पैसे देणे हे सामान्य आर्थिक नियमांचे उल्लंघन असल्याचे आयोगाने नमूद केले.
📂
काय आहे नेमके प्रकरण?
गैरव्यवहाराचा तपशील
निविदा प्रक्रियेशिवायच काम
गटार स्वच्छ करणे आणि झाडे तोडण्यासाठी पंचायतीने कोणतीही निविदा काढली नाही, जे कायद्याचे उल्लंघन आहे.
पाच लाखांचा गैरवापर
जून ते डिसेंबर २०२३ दरम्यान, तत्कालीन सरपंच फर्नांडिस यांनी स्वतःच्या आणि इतर १० पंचांच्या खात्यात एकूण ५ लाख रुपये जमा केले.
सदस्याची याचिका
पंचायतीचे सदस्य हिलारीयो परेरा यांनी या गैरव्यवहाराविरोधात निवडणूक आयोगात याचिका दाखल करून सर्वांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती.
#GoaNews #AgasaimPanchayat #GoaPolitics #Corruption #ElectionCommission
हेही वाचा