२०२७ पूर्वी गोव्यात क्रिकेट स्टेडियम उभारणार : रोहन गावस देसाई

जीसीएच्या म्हावळींगेतील जागेला प्राधान्य देण्याचे आश्वासन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th September, 11:24 pm
२०२७ पूर्वी गोव्यात क्रिकेट स्टेडियम उभारणार : रोहन गावस देसाई
पणजी : "आमचे ‘परिवर्तन’ पॅनल निवडून आले तर २०२७ पूर्वी गोव्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम तयार होईल," असे आश्वासन बीसीसीआयचे सहसचिव रोहन गावस देसाई यांनी दिले. जीसीए निवडणुकीसाठी उभारण्यात आलेल्या ‘परिवर्तन’ पॅनेलचा जाहीरनामा शनिवारी जाहीर करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. डिचोलीतील म्हावळींगे येथील जीसीएच्या मालकीच्या जागेला यासाठी प्राधान्य दिले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
🏏
'परिवर्तन' पॅनलच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे
निवडणुकीतील आश्वासने
🏟️ २०२७ पूर्वी स्टेडियम
पुढील तीन वर्षांत म्हावळींगे येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणे हे मुख्य ध्येय आहे. यासाठी पूर्ण पॅनल निवडून येणे आवश्यक आहे.
🎯 ५ वर्षांचे धोरण
राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू तयार करण्यासाठी पाच वर्षांचे धोरण ठेवले आहे. नवीन तंत्रज्ञान आणि सुविधा आणून चांगले प्रशिक्षण दिले जाईल.
🤝 सर्व १०७ क्लबांना सोबत घेणार
"हे पॅनेल क्लबांचे आहे आणि सर्व १०७ क्लबांना आम्ही सोबत घेऊन पुढे जात आहोत," असे अध्यक्षपदाचे उमेदवार महेश कांदोळकर यांनी सांगितले.
🗣️
BCCI प्रतिनिधीत्वावरून झालेला संघर्ष
रोहन गावस देसाई यांनी सांगितले की, "बीसीसीआयने प्रतिनिधी मागितल्यानंतरही जीसीए बैठक घेत नव्हती. उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने बैठक झाली. ५ कार्यकारी सदस्यांनी माझे नाव निश्चित केले, पण तो ठराव पाठवण्यासाठी जीसीएच्या मुख्य अधिकाऱ्याने अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. अखेर न्यायालयाच्या आदेशाची प्रत जोडून अर्ज पाठवावा लागला."
#GoaCricket #GCAElection #RohanGaunsDessai #GoaNews #SportsPolitics
हेही वाचा