वागातोरमध्ये मच्छीमारांची होडी उलटली; लाईफ जॅकेटमुळे वाचले चार जणांचे प्राण

होडीचे नुकसान

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
03rd September, 11:40 am
वागातोरमध्ये मच्छीमारांची होडी उलटली; लाईफ जॅकेटमुळे वाचले चार जणांचे प्राण

पणजी : वागातोर-हणजुण किनाऱ्यावर सकाळी समुद्रात घडलेल्या एका थरारक प्रसंगात चार मच्छीमारांचे प्राण थोडक्यात वाचले. मासेमारीसाठी चार जण समुद्रात होडी घेऊन गेले होते. खवळलेल्या समुद्राच्या जोरदार लाटांमुळे मच्छीमारांची होडी उलटली. मात्र जीव वाचवण्यासाठी त्यांनी लाईफ जॅकेटचा आधार घेतला.



शिवोली येथील राज चोडणकर (२५) व त्याचे सहकारी आकाश (२३), अंजुली एक्का (२५) आणि संजय सेक्का (२४), हे चौघे समुद्रात बुडण्याच्या स्थितीत होते. प्रसंगावधान दाखवत राजने तातडीने मोबाइलवरून आपल्या मित्रांशी संपर्क साधला.



यानंतर शिवोली-गुडे येथील बृजेश नाईक, उत्कर्ष खोरजुवेकर, वैभव खोरजुवेकर आणि सर्वेश चोडणकर यांनी धाव घेऊन किनाऱ्यावर पोहोचत पोलीस, लाईफगार्ड आणि म्हापसा अग्निशामक दलाच्या मदतीने सर्व मच्छीमारांना सुरक्षित बाहेर काढले. होडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी चारही जणांचा जीव वाचल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा