'काँग्रेसने राजकीय सभ्यतेच्या सीमा ओलांडल्या'; राहुल गांधींच्या मिमिक्रीवर मुख्यमंत्री डॉ. सावंतांची संतप्त प्रतिक्रिया

इंदूरमधील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी व ज्येष्ठ महिलेची वादग्रस्त पद्धतीने मिमिक्री केल्यानंतर राजकीय वाद पेटला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह भाजप नेत्यांनी राहुल यांच्यावर टीका केली, तर काँग्रेसने राजकीय व्यंग्याचा बचाव केला आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
10 mins ago
'काँग्रेसने राजकीय सभ्यतेच्या सीमा ओलांडल्या'; राहुल गांधींच्या मिमिक्रीवर मुख्यमंत्री डॉ. सावंतांची संतप्त प्रतिक्रिया

पणजी : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मध्य प्रदेशातील इंदूर येथे आयोजित 'छात्रों की गूंज' या युवा संवाद कार्यक्रमात घडलेल्या एका वादग्रस्त प्रसंगामुळे देशभरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या एका मिमिक्रीवरून सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.



गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या घटनेवर अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी राजकीय टीका करताना पातळी सोडून वागत असून त्यांनी राजकीय सभ्यतेच्या सर्व सीमा ओलांडल्याचा घणाघाती आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे. लोकशाही व्यवस्थेत राजकीय विरोध आणि मतभेद असणे स्वाभाविक व आवश्यक आहे; विरोधकांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्न विचारावेत, निर्णयांना आव्हान द्यावे आणि जोरदार वादविवाद करावा. परंतु, विरोध करताना राजकीय चर्चेचा स्तर थेट एखाद्याच्या आई-वडिलांवर किंवा घरातील ज्येष्ठांवर वैयक्तिक टीका करण्यापर्यंत घसरणे अत्यंत दुर्दैवी व निंदनीय आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. वैयक्तिक हल्ले करणे ही भारतीय संस्कृती आणि लोकशाही मूल्यांच्या विरोधी असून प्रत्येक पक्षाने ज्येष्ठांचा व माता-पित्यांचा सन्मान राखणे ही प्राथमिक जबाबदारी आहे, असे सांगत काँग्रेसने अशा गलिच्छ राजकारणापासून दूर राहावे, असा इशारा त्यांनी दिला.


Goa Chief Minister Pramod Sawant on plans to make the Goa 2037 vision a  reality - BusinessToday


इंदूरमधील या कार्यक्रमात स्टँड-अप कॉमेडियन पुलकित मणि यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्याच्या शैलीची, हावभावांची आणि विदेशी नेत्यांशी संवाद साधण्याच्या पद्धतीची नक्कल केली. 'माय फ्रेंड, हाऊ आर यू?' अशा संवादांवर राहुल गांधी यांनीही विनोदी शैलीत उत्तरे दिली. या मिमिक्रीमध्ये परराष्ट्र धोरणासह काही अलीकडील घटनांचा संदर्भ देण्यात आला होता. या कार्यक्रमाचा व्हिडिओ समाजमाध्‍यमांवर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर वादाला तोंड फुटले.


राहुल गांधी के सामने PM मोदी की मिमिक्री कर छाए पुलकित मणि कौन हैं?


भाजप नेत्यांकडून टीका 

व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपकडून यावर अत्यंत तीव्र टीका करण्यात आली. भाजप नेत्यांनी या प्रकारावर तीव्र आक्षेप घेत पंतप्रधान मोदी आणि एका वृद्ध महिलेच्या संदर्भातील प्रसंगाची खिल्ली उडवल्याचा थेट आरोप केला. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसेच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासह प्रमुख भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत घडलेल्या या प्रकाराचा तीव्र निषेध केला.


Governance Crises Push BJP's 'Unknown' Chief Ministers Into Harsh Spotlight  - The Wire

काँग्रेसकडून राजकीय व्यंग्याचा बचाव

दुसरीकडे, या वादंगानंतर काँग्रेसकडून राजकीय व्यंग्याचा बचाव करण्यात आला आहे. राजकारणात विनोद, उपहास आणि व्यंग्यालाही योग्य स्थान असावे अशी भूमिका विरोधकांनी मांडली आहे. या प्रसंगामुळे सध्या देशात राजकीय व्यंग्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सार्वजनिक जीवनातील नैतिक मर्यादा यावर व्यापक चर्चा सुरू झाली आहे.


कंधे पर कुदाल-माथे पर गमछा..चेहरे पर मुस्कान, मनरेगा बचाओ में राहुल-खड़गे  का देसी लुक | Mgnrega Controversy Congress Attack Kharge Rahul Gandhi On  Vbgramg Bill | Asianet News Hindi

हेही वाचा
सर्व पहा