कर्मचारी भरती : दिव्यांग उमेदवारांना परीक्षेसाठी मिळणार ३५ मिनिटे अधिक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29th August, 04:55 pm
कर्मचारी भरती : दिव्यांग उमेदवारांना परीक्षेसाठी मिळणार ३५ मिनिटे अधिक

पणजी : राज्यातील शिक्षक, तांत्रिक साहाय्यक आणि लायब्ररीयन या पदांसाठी होणाऱ्या संगणकाधारित (सीबीटी) परीक्षेत दिव्यांग गटातील उमेदवारांना विशेष सवलत देण्यात आली आहे. कर्मचारी भरती आयोगाने जारी केलेल्या सूचनेनुसार, या उमेदवारांना प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी इतर परीक्षार्थ्यांपेक्षा ३५ मिनिटांचा अधिक वेळ मिळणार आहे.

सर्वसामान्य उमेदवारांना ८० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी १०० मिनिटे उपलब्ध असतील, तर दिव्यांग उमेदवारांना १३५ मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. तांत्रिक साहाय्यक (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल), तांत्रिक साहाय्यक (कॉम्प्युटर/इलेक्ट्रॉनिक्स/आयटी), तांत्रिक अधिकारी, कनिष्ठ तांत्रिक अधिकारी आणि सहाय्यक शिक्षक या पदांसाठीची सीबीटी परीक्षा १३ व १४ सप्टेंबर रोजी घेण्यात येईल.

या परीक्षेसाठीचे केंद्र उत्तर गोव्यात आग्नेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड डिझाईन (आसगाव) आणि सेंट झेवियर महाविद्यालय (धुळेर) येथे असतील. तर दक्षिण गोव्यात डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालय (फातोर्डा), रोजरी महाविद्यालय (नावेली) आणि एनआयटी (कुंकळ्ळी) येथे परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. सहाय्यक शिक्षक पदासाठी फक्त एकदाच सीबीटी परीक्षा होणार आहे.