नारळ उत्पादनात मोठी घट; माडांना कीड, शहरीकरणाचा फटका

ठोस उपाययोजना करण्याची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd August, 11:43 pm
नारळ उत्पादनात मोठी घट; माडांना कीड, शहरीकरणाचा फटका
🌴
⚠️ गोव्यात नारळ उत्पादनात ७.५४% घट | कीटकांचा वाढता हल्ला
पणजी : गोव्यातील माडांवर कीटकांचा वाढता हल्ला आणि झपाट्याने वाढणाऱ्या शहरीकरणामुळे राज्यातील नारळ उत्पादनात ७.५४ टक्क्यांची घट झाली आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, ही घट केवळ शेतकऱ्यांच्या उत्पन्नालाच नव्हे तर गोमंतकीय जीवनशैलीलाही धक्का देत आहे.
🔍
ऐतिहासिक संदर्भ
बाणावली आणि कळंगुट या गावांमधील खोबऱ्याचे प्रमाण अधिक असलेले माड प्रसिद्ध होते. "पूर्वी नारळ स्वस्त आणि मोठा मिळत असे. आज मात्र दर्जेदार नारळाची कमतरता आहे" असे नारळ उत्पादक उदय म्हांब्रे सांगतात.
🐛
घट होण्याची प्रमुख कारणे
कृषी विभागाचे विश्लेषण
१)
रेड पाम वायव्हिल आणि एरिओफाइड माइट या कीटकांचा प्रादुर्भाव (६०% पर्यंत उत्पादन घट)
२)
शहरीकरणामुळे माडांच्या जमिनीत घट
३)
रानटी जनावरांकडून होणारी नासधूस
📅 कीटकांच्या प्रादुर्भावाचा कालावधी
२०००
एरिओफाइड माइटचा प्रादुर्भाव सुरू
२०१५
रेड पाम वायव्हिलचा प्रादुर्भाव सुरू
२०२५
७.५४% उत्पादन घट
🌾
नारळ उत्पादक उदय म्हांब्रे यांचे म्हणणे
"सरकारने ठोस उपाययोजना करून कीटकनाशक औषध तयार केले पाहिजे, अन्यथा नारळ गोव्याच्या संस्कृतीतून नष्ट होईल. प्रत्येक गोमंतकीयाच्या घरात नारळाशिवाय कोणताही पदार्थ पूर्ण होत नसे."
📌 नोंद: एरिओफाइड माइट हे कीटक माड हळूहळू निस्तेज करतात तर रेड पाम वायव्हिल थेट फळांना नुकसान पोहोचवतात.