मुरगाव : ईअरफोनवर बोलत रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या तरुणाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
14th July, 02:01 pm
मुरगाव : ईअरफोनवर बोलत रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या तरुणाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू

पणजी सांकवाळ येथे ईअरफोनवर बोलत रेल्वे रूळ ओलांडताना धावत्या रेल्वेखाली आल्याने २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कासावली आणि सांकवाळ दरम्यान  घडली.

वास्को रेल्वे पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीची ओळख अरुण होरो (२३, मूळ मुंडा टोली, सिमडेगा-झारखंड) अशी झाली आहे. तो रेल्वे रुळांवरून चालत असताना त्याच्या कानात ईअरफोन होते आणि तो मोबाईलवर बोलत होता. यामुळे, समोरून येणाऱ्या रेल्वेने वाजवलेल्या हॉर्नकडे त्याचे दुर्लक्ष झाले. रेल्वेखाली आल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह रुळांच्या बाजूला गंभीर जखमांसह आढळून आला. सर्व प्राथमिक तपास व औपचारिकता पूर्ण करून मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आला असून लवकरच शवविच्छेदन करण्यात येणार आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४ अंतर्गत अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुरगाव पोलीस उपअधीक्षक गुरुदास कामत यांच्या मार्गदर्शनाखाली वास्को रेल्वे पोलीस निरीक्षक अमरनाथ पासी पुढील तपास करत आहेत. 


हेही वाचा