शिक्षण : सर्व विद्यालयांनी १८ जुलैपर्यंत पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांची माहिती पाठविणे सक्तीचे

गोवा शालान्त मंडळाद्वारे परिपत्रक जारी

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
14th July, 03:14 pm
शिक्षण : सर्व विद्यालयांनी १८ जुलैपर्यंत पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांची माहिती पाठविणे सक्तीचे

पणजी : यंदाच्या शैक्षणिक वर्षात (२०२५ - २६) जे विद्यार्थी दहावी व बारावीत आहेत, त्यांची माहिती पोर्टलच्या आधारे मंडळाला देणे बंधनकारक असल्याचे शालान्त मंडळाने सर्व विद्यालये तसेच उच्च माध्यमिक विद्यालयांना कळविले आहे. ही माहिती १८ जुलैपर्यंत द्यावी, असे परिपत्रक शालान्त मंडळाने जारी केले आहे. माहिती न दिल्यास संबंधीत विद्यार्थ्यांना दहावी, बारावीच्या अंतिम परीक्षेला बसता येणार नाही, असे परिपत्रक शालान्त मंडळाने जारी केले आहे. 

गेल्या वर्षी (२०२४ - २५) ज्या विद्यार्थ्यांनी नववीत व अकरावीत प्रवेश घेतलेला आहे, त्यांची माहिती मुख्याध्यापकांनी https://servicel.gbshse.in या पोर्टलच्या आधारे सादर करण्याचे निर्देश मंडळाने २८ मे २०२५ रोजी परिपत्रक जारी केले  होते. हे विद्यार्थी यंदा दहावी, बारावीची शालान्त मंडळाच्या परीक्षेला बसणार आहेत. माहिती सादर करण्यासाठी १५ जून ही शेवटची तारीख होती. बऱ्याच विद्यालयांनी माहिती सादर केलेली नाही. त्यांना १८ जुलै २०२५पर्यंत माहिती सादर करणे आवश्यक आहे.


हेही वाचा