ओटीटीवर काय पहाल?

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
20th June, 12:40 am
ओटीटीवर काय पहाल?

१ जूनपासून आतापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिका ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या आहेत. त्यातील काही निवडक चित्रपट आणि मालिकांना प्रेक्षकांचे अधिक प्रेम मिळत आहे. ती पुढील प्रमाणे


थुडारम । जियो हॉटस्टार
मोहनलाल अभिनीत हा एक कौटुंबिक नाट्यप्रधान क्राइम ड्रामा आहे. एक निवृत्त पोलीस अधिकारी एका जुन्या प्रकरणात पुन्हा अडकतो. अतीत आणि वर्तमानातील गुंतागुंतीमुळे त्याच्या आयुष्यात नाट्यमय वळणे येतात.


अग्निथावासी । झी ५
रंगायना रघु अभिनीत हा एक रहस्यमय क्राइम थ्रिलर आहे. एका छोट्या गावात घडणाऱ्या विचित्र हत्यांची मालिका आणि त्यामागील गूढ उकलण्याचा प्रयत्न करणारा तपास अधिकारी यावर हा चित्रपट आधारित आहे.


टूरिस्ट फॅमिली । जियो हॉटस्टार
शशिकुमार आणि सिमरन यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट श्रीलंकेतून भारतात आलेल्या एका तमिळ शरणार्थी कुटुंबाची ही हलकीफुलकी आणि भावनिक कथा आहे. भारतात नवीन आयुष्य सुरू करताना त्यांना आलेल्या अडचणी आणि हास्यविनोदाने भरलेला प्रवास यात दाखवला आहे.


क्रिमिनल जस्टिस: अ फॅमिली मॅटर । झी ५
पंकज त्रिपाठी अभिनीत या मालिकेत अ‍ॅडव्होकेट माधव मिश्रा एका गुंतागुंतीच्या कौटुंबिक खटल्यात अडकतो. कोर्टरूम ड्रामा, भावनिक संघर्ष आणि कायदेशीर गुंतागुंत यांचा सुरेख संगम यात पहायला मिळतो.


द क्वीन्स गॅम्बिट । नेटफिक्लस
१९६० च्या दशकातील ही मालिका बेथ हार्मन या अनाथ मुलीच्या बुद्धिबळातील प्रवासावर आधारित आहे. तिचा नशेच्या व्यसनाशी संघर्ष, बुद्धिमत्ता आणि मानसिक आरोग्य यांचा प्रभावी मिलाफ आहे. या मालिकेला ९ एमी आणि २ गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले आहेत.

हेही वाचा