सांगे : सावडीमळ येथील स्टेप इन बार अॅण्ड रेस्टॉरंटच्या मागे असलेल्या बंद खोलीत सुरेश खडाळकर (मूळ कर्नाटक) याचा मृतदेह आज सकाळी आढळून आला. मृतदेह फुगलेल्या आणि सडलेल्या अवस्थेत होता.
नेमके प्रकरण काय ?
वृद्ध आई वडिलांची देखभाल करण्यासाठी सावडीमळ येथील एका महिलेने झारखंड येथील एक तरुणी तसेच कर्नाटक येथील सुरेश खडाळकर यांना केअरटेकर म्हणून कामावर ठेवले होते. स्वतःच्या बंगल्यामागेच या दोघांची राहण्याची व्यवस्था देखील केली होती. दरम्यान गेले दोन दिवस सुरेश कामावर हजर झाला नाही. यामुळे मालकिणीने सुरेशच्या खोलीजवळ जाऊन पाहिले. खोली आतून बंद होती तसेच आतून दुर्गंधी येत होती. मालकिणीने तत्काळ अग्निशामक दल आणि पोलिसांना पाचारण केले.
आज दुपारी सुमारे १२.४५ वाजता अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होऊन दरवाजा उघडला. खोलीत सुरेशचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून. सुरेशचा मृत्यू नेमका कसा झाला याचा उलगडा शवविच्छेदनानंतरच होईल. पुढील तपास पोलीस करत आहेत.
बातमी अपडेट होत आहे.