मडगाव : फातोर्डा येथून मनोरुग्ण युवतीचे अपहरण करून तिला कासावलीला नेऊन गँगरेप करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयितांपैकी दोन संशयितांना अटी-शर्तीवर जामीन मंजूर झाला, तर दोघांचा जामीन फेटाळण्यात आला आहे.
मानसिक स्थिती ठिक नसलेल्या युवतीवर जानेवारी २०२५ मध्ये अत्याचार झाला होता. या प्रकरणातील संशयित आदिल अब्दुल करीम लाबसाब अलगर (१८, रा. विद्यामंदिर चिखली-वास्को), मोहम्मद अली मुल्ला (२२, रा. मांगुरहिल-वास्को), शाहजाद मोहम्मद समीम शेख (१८, रा. खारीवाडा-वास्को), विरेश अमरीश अग्वांदा (१८, रा. गांधीनगर-वास्को) व मोहम्मद यासिर हबिबुल्ला शेख (१८, रा. सडा-वास्को) यांना अटक झाली. सध्या सर्व संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत. दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश शेरीन पॉल यांच्या न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू आहे.
यातील संशयित मोहम्मद अली मुल्ला व संशयित विरेश अग्वांदा यांना एक लाखांचा बाँड व तेवढ्याच रकमेचा हमीदार, परवानगीशिवाय राज्याबाहेर न जाणे, राहता पत्ता, मोबाईल देणे, पुरावे नष्ट न करणे व इतर अटीवर जामीन मंजूर झाला, तर संशयित मोहम्मद यासिर शेख व मोहम्मद आदिल यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.