बी. एल.संतोष-दामूंमध्ये तब्बल साडेचार तास चर्चा!

काय होते विषय? इथे वाचा...

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th June, 02:26 pm
बी. एल.संतोष-दामूंमध्ये तब्बल साडेचार तास चर्चा!

🏛️ बी. एल. संतोष - दामू नाईक : साडेचार तास चर्चा!

काय होते विषय? इथे वाचा...

📰 प्रतिनिधी | गोवन वार्ता
📍 पणजी, गोवा

कर्नाटकला जाण्यासाठी गुरुवारी गोव्यातील दाबोळी विमानतळावर उतरलेल्या भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेत भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी त्यांच्याशी पक्षांतर्गत बदल आणि राज्यातील राजकीय स्थितीबाबत साडेचार तास चर्चा केली.

त्यानंतर संतोष शुक्रवारी सकाळी कुमठा-कारवार येथे रवाना झाले. “संतोष यांच्या भेटीतील सविस्तर तपशील आपण उघड करू शकत नाही. पण, पक्षांतर्गत आणि राजकीय बदलांबाबत माझी त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे,” असे दामू नाईक यांनी स्पष्ट केले.

बी. एल. संतोष दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर आपण त्यांच्यासोबत फातोर्डा येथे जेवण केले. त्यानंतर आम्ही पाळोळे-काणकोण येथील क्लाऊड नाईन सरोवर हॉटेलमध्ये पोहोचलो.

प्रदेशाध्यक्ष या नात्याने आपण काय बदल हवेत हे स्पष्ट केले असून त्यानुसार पुढील काही दिवसांत बदल होतील याची खात्रीही त्यांनी दिली.

🔴 विशेष: पक्षांतर्गत बदल लवकरच अपेक्षित!
⏱️ अपडेट: 6 जून 2025