युरोप : यूक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला, ४० पेक्षा अधिक बॉम्बर जेट्स नष्ट

पुतीनच्या प्रत्युत्तराकडे सर्वांचे लक्ष!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
02nd June, 01:25 pm
युरोप : यूक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला, ४० पेक्षा अधिक बॉम्बर जेट्स नष्ट

मॉस्को : यूक्रेनच्या सुरक्षादलाने रशियाच्या सैन्य ठाण्यांवर मोठा ड्रोन हल्ला केला आहे. यामध्ये ४० पेक्षा अधिक रशियन बॉम्बर जेट्सना नुकसान झाले आहे. कीव इंडिपेंडंटच्या माहितीनुसार, यूक्रेनने रशियाच्या एयरबेस ०१०६ आणि बेलाया एयरबेसवर निशाणा साधला आहे.


Ukraine says it attacked fuel depot serving Russian strategic bombers' air  base | CNN


ड्रोन हल्ल्यामुळे एयरबेसवर आग

ओलेन्या एयरबेसवरील रशियन स्ट्रॅटेजिक बॉम्बर्समध्ये आग लागल्याची बातमी आहे. शिवाय साइबेरियातील श्रेडॉनी गावाजवळ असलेल्या सैन्य युनिटवरही ड्रोन हल्ला झाला आहे. इरकुत्स्क प्रदेशाचे गव्हर्नर यांनी हा साइबेरियामधील पहिलाच हल्ला असल्याची पुष्टी केली आहे.


Pictures of destroyed Russian aircraft at Crimean airbase published on  social media - Militarnyi


यूक्रेनची विशेष सैन्य मोहीम

यूक्रेनच्या सुरक्षादलाने रशियाच्या सीमेजवळ न राहता, हजारो किलोमीटर दूर असलेल्या सैन्य ठिकाणांवर हल्ले केले आहेत. या मोहीमेचा उद्देश रशियन विमानांना निष्क्रिय करणे आहे. बेलाया एयरबेसवरही मोठी आग लागल्याचे वृत्त आहे. यापूर्वी रशियामध्ये दोन पूलांवर हल्ले करण्यात आले होते, ज्यात सात जण मृत्यूमुखी पडले आहेत. या घटनांची सविस्तर माहिती येण्याची प्रतीक्षा आहे.


Ukraine Just Hit Russian Airbase, Microchips Plant, Police HQ and Oil Hubs  - Newsweek


यूक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध गेल्या वर्षांपासून सुरू आहे आणि दोन्ही देशांनी एकमेकांवर अनेक ठिकाणी सैन्य हल्ले केले आहेत. यूक्रेनने या संघर्षात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत रशियाच्या महत्त्वाच्या सैन्य ठिकाणांवर ड्रोन हल्ले वाढवले आहेत. या हल्ल्यांमुळे रशियाच्या सैन्य क्षमतेवर सध्या मोठा परिणाम होतोय. विशेषतः विमानतळांवरील बॉम्बर जेट्सना नुकसान झाल्यामुळे त्यांची हवाई ताकद कमी लक्षणीय प्रमाणात कमी झाली आहे. सायबेरियातल्या दुर्गम ठिकाणीही हल्ले झाल्यामुळे युद्धाचा विस्तार आणि वाढलेली तीव्रता दिसून येते.


Ukraine says it destroyed Russian warplanes in a drone attack on Morozovsk  airfield


ही नीती युद्धाच्या पुढील टप्प्यांमध्ये अधिक निर्णायक ठरू शकते, कारण एका बाजूचा सैन्य साधनांचा मोठ्या प्रमाणात नाश झाल्याने युद्धभूमीवरील सामरिक स्थितीत बदल होतो. भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमधून हेच स्पष्ट झाले होते. ही घटना सामरीक आणि भूराजकीय तसेच सुरक्षा धोरणांमध्येही महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यावर कोणती रणनीती आखतात याकडे देखील नाटो देशांचे लक्ष लागून राहिले आहे. 


Ukrainian S-200 Missile Destroyed an important Russian Strategic Aircraft  at a Military Airfield - YouTube

हेही वाचा