बेळगाव : पत्नीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

काही काळापासून पत्नीपासून वेगळे राहत होते सुनील मुळेमणी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
01st June, 01:34 pm
बेळगाव : पत्नीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

पणजी : बेळगावच्या अनगोळमधील शिवशक्ती कॉलनीत शुक्रवारी एक हृदयद्रावक घटना घडली. सुनील मुळेमणी (वय ३३) या तरुणाने मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने पत्नीच्या त्रासाला जबाबदार धरले आहे.

सुनील मुळेमणी हे अनगोळमधील श्रीराम कॉलनीतील रहिवासी असून, सध्या ते पत्नी आणि मुलीपासून वेगळे राहत होते. ते कंप्युटर दुरुस्तीचा व्यवसाय करीत होते आणि शिवशक्ती कॉलनीत भाड्याने दुकान घेतले होते.

शुक्रवारी सकाळी त्यांनी दुकानातच वायरच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. माहिती मिळताच उद्यमबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासात पोलिसांच्या हाती आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यात स्पष्ट शब्दांत "My wife is the reason for my suicide" असे लिहिले आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, वैवाहिक तणावाचे गंभीर परिणाम काय होऊ शकतात, याचे हे उदाहरण मानले जात आहे. उद्यमबाग पोलिसांनी या प्रकरणी नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.


हेही वाचा