यूपी एटीएसच्या कारवाईत मोठा खुलासा
लखनौ : पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या तुफैल मकसूद या युवकाच्या मोबाईलवरून धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश एटीएसच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, तो पाकिस्तानी महिला व आयएसआय एजंट नफिसा हिच्याशी संपर्कात होता आणि तिच्या माध्यमातून २४० भारतीय तरुणांचे
कट्टरवादी विचारांच्या आधारे ब्रेनवॉश
तुफैलने तयार केलेल्या १९ व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये ८०० लोकांचा समावेश होता. यातून तो सातत्याने धार्मिक द्वेष पसरवणारे मेसेज, व्हिडिओ आणि मजकूर शेअर करत होता. हे सर्व जण पूर्व उत्तर प्रदेशमधील सात जिल्ह्यांतील आहेत. 'गजवा-ए-हिंद' या कट्टरपंथीय विचारधारेला अनुसरून तुफैल भारतात २०४७ पूर्वी कट्टरपंथी शासन आणण्याचे आणि शरीयत कायदा लागू करण्याचे संदेश पसरवत होता.
तपासात असेही समोर आले की, नफिसाने भारतातील २४० तरुणांशी सोशल मीडियावरून संपर्क केला होता, त्यात बरेली, मुरादाबाद, रामपूर, कन्नौज, लखनौ आणि वाराणसी येथील सहा युवकांचा समावेश आहे. एटीएसच्या मते, आयएसआय नफिसाचा वापर भारतातील तरुणांना भडकवण्यासाठी आणि गुप्त माहिती मिळवण्यासाठी करत होती. नफिसा धार्मिक भावना चिघळवून भारतात फूट पाडण्याचा प्रयत्न करत होती.
तुफैल याच नेटवर्कचा भाग होता. त्याच्या मोबाईलवर तब्बल ६०० पाकिस्तानी मोबाईल नंबर आढळले. भारताच्या सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती तुफैल शेअर करत होता, अशी माहिती एटीएसने दिली आहे. सध्या तुफैलसह दिल्लीचा हारुन आणि मोरादाबादचा शहजाद वहाब एटीएसच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.