अर्शद वारसी अडचणीत! शेअर बाजारात व्यवहार करण्यास बंदी; 'हे' कारण आले समोर

पत्नीसह ५८ लोकांचा फसव्या कारवायांमध्ये सहभाग

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
30th May, 04:12 pm
अर्शद वारसी अडचणीत! शेअर बाजारात व्यवहार करण्यास बंदी; 'हे' कारण आले समोर

मुंबई : शेअर बाजार नियामक सेबीने बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी, त्याची पत्नी आणि त्याचा भाऊ यांना एका वर्षासाठी शेअर बाजारात बंदी घातल्याची माहिती हाती आली आहे. अर्शत वारसी व्यतिरिक्त इतर ५८ लोकांनाही ५ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. साधना ब्रॉडकास्ट लिमिटेडच्या शेअर्समध्ये छेडछाड केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली असून यातील अनेकजण बाजारात फसव्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचे आढळून आल्याचे सेबीचे म्हणणे आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार अर्शद वारसी आणि त्याचे काही साथीदार मनमानी पद्धतीने साधना ब्रॉडकास्ट लिमिटेडच्या शेअर्सच्या किंमत वाढवत असत आणि त्यांना जास्त किमतीत म्हणजेच 'पंप अँड डंप'ने विकत असत. त्यांच्या या कारनाम्यामुळे या प्रकरणातील संबंधित लोकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा दंड तसेच त्यांची १.०५ कोटी रुपयांची बेकायदेशीर कमाई जप्त करण्याचे आदेशही दिले आहेत. 

यू ट्यूब चॅनेलद्वारा फसवे मार्केटिंग
'पंप अँड डंप' योजनेद्वारे संबंधितांनी त्यांचा हिस्सा विकण्यापूर्वी साधना ब्रॉडकास्ट लिमिटेडच्या शेअरची किंमत कृत्रिमरित्या वाढवण्यासाठी दिशाभूल करणारे यूट्यूब व्हिडिओ वापरले होते. ८ मार्च २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत चाललेल्या सेबीच्या तपासात या फसव्या कारवायांची संपूर्ण माहिती देण्यात आली. सेबीने युट्यूबवर खोट्या गोष्टींचा प्रचार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पेड मार्केटिंग मोहिमेचाही पर्दाफाश केला आहे. द अॅडव्हायझर, मिडकॅप कॉल्स, प्रॉफिट यात्रा, मनीवाईज आणि इंडिया बुलिश हे यूट्यूब चॅनेल चुकीची माहिती पसरवण्यात सहभागी असल्याचे सेबीच्या चौकशीत समोर आले होते. 

हेही वाचा