रोहित कदम जीएसआयडीसी एमडी
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सरकारने राज्य नागरी सेवेतील ११ वरिष्ठ श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून रोहित कदम हे गोवा राज्य पायाभूत सुविधा महामंडळाचे (जीएसआयडीसी) नवे व्यवस्थापकीय संचालक बनले आहेत.
बदलीनंतरचे नवे अधिकारी असे : आग्नेल फर्नांडिस - लोकायुक्त सचिव, रोहित कदम - जीएसआयडीसीचे एमडी, चंद्रकांत शेटकर - भू नोंदणी संचालक, हरीश अडकोणकर - कचरा व्यवस्थापन महामंडळाचे एमडी, गुरुदास देसाई - उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी - १, स्वाती दळवी - रवींद्र भवन, मडगाव, एमएस, महादेव आरोंदेकर - नागरी विमानसेवा संचालक, वीरा नायक - छपाई व मुद्रण संचालक, अभीर हेदे - अतिरिक्त खाण संचालक - १, मंदार नाईक - अतिरिक्त भू नोंदणी संचालक, दीपेश प्रियोळकर - एमडी, गोवा राज्य एससी, ओबीसी वित्त व विकास महामंडळ.
आदिवासी कल्याण खात्यात बदल
आदिवासी कल्याण खात्याच्या दक्षिण गोवा उपसंचालकपदी नीलेश नाईक, तर उत्तर गोवा उपसंचालकपदी अनिल राणे सरदेसाई यांची नेमणूक झाली आहे. दरम्यान, श्रीपाद माजीक हे साखळी नगरपालिकेचे नवे मुख्याधिकारी असतील.